Saturday, 19 June 2021

मोफत 'शिवभोजन' थाळीला एक महिन्याची मुदतवाढ ! "आतापर्यंत 90 लाख 81 हजार 587 मोफत थाळ्यांचे वितरण"

मोफत 'शिवभोजन' थाळीला एक महिन्याची मुदतवाढ ! 

"आतापर्यंत 90 लाख 81 हजार 587 मोफत थाळ्यांचे वितरण"



मुंबई : ज्यात सुरु असलेल्या ‘ब्रेक द चेन’ या प्रक्रियेअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध घटकांसाठी मदतीचे पॅकेज घोषित केले होते. त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना 14 जूनपर्यंत मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. अशातच आता ‘शिवभोजन’ थाळीची ही मुदत वाढवण्यात आली आहे.

राज्यातील गरीब जनतेला मोफत ‘शिवभोजन’ थाळीची मुदत एक महिन्यासाठी वाढवण्यात आली असून 15 एप्रिल 2021 पासून सुरु असलेली ही सुविधा आता 14 जुलै 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन पाठवलेल्या नि:शुल्क थाळीच्या मुदतवाढीच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.

राज्यात आतापर्यंत 1332 शिवभोजन केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. नव्यानं मंजूर केलेल्या 441 केंद्रापैकी काही केंद्रे सुरु झाली असून काही केंद्रे अल्पावधीतच सुरु होतील. आजघडीला राज्यात एकूण 1043 शिवभोजन केंद्रे सुरु आहेत.

दरम्यान, शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत 15 एप्रिल ते 17 जून या काळात 90 लाख 81 हजार 587 मोफत थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत शिवभोजन योजनेअंतर्गत 4 कोटी 70 लाख 18 हजार 184 थाळ्यांचे वितरण झाले आहे.

No comments:

Post a Comment

पिंपळेश्वर मंदिराची जमीन अखेर मंदिरालाच; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा !!

पिंपळेश्वर मंदिराची जमीन अखेर मंदिरालाच; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा !! डोंबिवली, संदीप शेंडगे : महसूल आणि उद्योग विभागाच्या ...