Wednesday, 23 November 2022

गुरचरन, गावठाण आदी जमीनीवरील बांधकामांना आलेल्या नोटिसा रद्द करण्याची झेडपी सदस्या जयश्री सासे यांची मागणी, तहसीलदारांना निवेदन‌ !

गुरचरन, गावठाण आदी जमीनीवरील बांधकामांना आलेल्या नोटिसा रद्द करण्याची झेडपी सदस्या जयश्री सासे यांची मागणी, तहसीलदारांना निवेदन‌ !

कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील  म्हारळ (बु) सर्कल मधील नागरीकांना शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६चे कलम ५०(३) अन्वये बांधकामे निष्कासित करण्या संदर्भात दिलेल्या नोटिसा रद्द कराव्यात अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती जयश्री सासे यांनी कल्याण तहसीलदार जयराज देशमुख यांना एका निवेदनाव्दारे केली आहे.

संपूर्ण देशातील शासकीय जमीनीवरील अतिक्रमणाबात उच्च न्यायालयाने लाखो करोडो लोकांना नोटिसा बजावल्या आहेत, या जमीनीवरील बांधकामे ३१ डिंसेबर निष्कासित करण्याचे आदेश दिले आहेत, कल्याण तालुक्यात सुमारे ४ हजार २७५ इतकी अतिक्रमणे आहेत ,यातील २३२ हेक्टर क्षेत्र बाधीत आहे, या सर्वाना नोटीसा बजावल्या आहेत, त्यामुळे खळबळ उडाली आहे,

याबाबत जिल्हा परिषद सदस्या जयश्री अच्युत सासे यांनी कल्याण तहसीलदार जयराज देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले, यामध्ये माझ्या मतदार संघातील संपूर्ण गावे ही आदीवाशी वाडीपाडे आहेत, येथील लोकांची घरे वडिलोपार्जित असून ते नियमीत ग्रामपंचायतीकडे करभरणा करत आहेत, त्यांच्या नोंदी ग्रामपंचायत दफ्तरी आहे,
मध्यंततरी कोरोना,नंतर पावसाचे संकट,अनेक अडचणी, समस्या, यामुळे शेतकरी, शेतमजूर, उदरनिर्वाहासाठी वनवन भटकत आहे, अशात त्यांच्या डोक्यावरील छत हिरावुन घेतले तर त्यांना जगणे मुश्कील होईल, उपासमारी निर्माण होऊन जीवंतपणी मरणयातना भोगाव्या लागतील,

शासनाने विदर्भातील शेतक-यांना जमीनी देऊन उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावला, शहरातील झोपडपट्टी धारकांना म्हाडातर्फे अलिशान इमारतीत प्लँट देऊन त्यांचे राहणीमान, जीवनमान उंचावले, त्याच समन्यायी तत्वाने माझ्या मतदार संघातील नागरीकांना त्यांच्या कुटूंबासाठी वापरात असलेली घरे हक्काची करुन त्यांचेही जीवनमान उंचावणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले असून तसे न झाल्यास नागरीकामध्ये आक्रोश निर्माण होऊन कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे,

यावेळी तहसीलदार जयराज देशमुख यांनी आपल्या भावना शासना पर्यत पोहचवील्या जातील असे सांगितले,

No comments:

Post a Comment

पिंपळेश्वर मंदिराची जमीन अखेर मंदिरालाच; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा !!

पिंपळेश्वर मंदिराची जमीन अखेर मंदिरालाच; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा !! डोंबिवली, संदीप शेंडगे : महसूल आणि उद्योग विभागाच्या ...