Thursday, 10 August 2023

सहकार विभागातील सरळ सेवा पदभरतीच्या उमेदवारांची टी.सी.एस. कंपनीमार्फत ऑनलाईन परीक्षा !!

सहकार विभागातील सरळ सेवा पदभरतीच्या उमेदवारांची टी.सी.एस. कंपनीमार्फत ऑनलाईन परीक्षा !!

पुणे, दि10 - सहकार विभागातील गट क संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याकरिता दि.06 जुलै 2023 रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीस अनुसरून विहीत मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी.सी.एस.या कंपनीमार्फत सोमवार दि.14 ऑगस्ट 2023 आणि बुधवार दि.16 ऑगस्ट 2023 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था प्रमोद जगताप यांनी कळविले आहे.

या परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबतच्या सूचना अर्ज सादर करतेवेळी नोंदणीकृत केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई-मेल आयडी यावर पाठविण्यात आल्या आहेत. तसेच प्रवेशपत्र डाउनलोड करावयाची लिंक आणि याबाबतच्या सूचना सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in, या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
उमेदवारांनी https://sahakarayukta.maharashtra.gov.in, या संकेतस्थळावरून परीक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त करावे आणि परोक्षेस येताना त्याची रंगीत प्रत सोबत ठेवावी. तसेच प्रवेशपत्रात नमूद सूचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करण्याची नोंद घ्यावी, 

No comments:

Post a Comment