उमरोळी येथे बौध्दजन पंचायत समिती खरवली विभाग शाखेचा धम्म प्रवचन मालिका कार्यक्रम उत्साहात साजरा !!
बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) : बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगाव संकल्पित वर्षावास धम्म प्रवचन मालिका पर्व दुसरे अंतर्गत उपविभागीय शाखा खरवली कार्यक्षेत्रातील उमरोळी बौद्धवाडी येथे रविवार दिनांक १० ऑगस्ट रोजी वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे शानदार आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात सखाराम जाधव, दामोदर जाधव यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करून त्या नंतर धम्म संस्कार विधी बौद्ध उपासिका स्वाती गायकवाड यांच्या धम्म वाणीतून झाला. तद्नंतर मान्यवरांचे स्वागत व धम्माचारी अमरादित्य यांचे धम्म प्रवचन झाले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखेचे सचिव अमोल मोहिते यांनी केले. अध्यक्षीय प्रास्ताविक विवेक जाधव आणि तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केले. आभारप्रदर्शन राजेश कासारे यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे यजमानपद बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक पाच खरवली विभाग व बौद्धजन सेवा संघ उमरोळी, नवयुवक बौद्ध सेवा संघ, महिला मंडळ स्थानिक व मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आले होते. सदर धम्म प्रवचन मालिका २०२५ पर्व दुसरे रविवार दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी लुंबिनी बुद्ध विहार उमरोळी पोस्ट खरवली तालुका माणगाव जिल्हा रायगड येथे विवेक तुकाराम जाधव अध्यक्ष बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक पाच चे विद्यमान अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली तालुका शाखा माणगाव चे विद्यमान अध्यक्ष रवींद्र मोरे, सचिव आर डी साळवी, दुय्यम सचिव रणजित मोहिते, कायदेशीर सल्लागार ॲड नरेश जाधव, खजिनदार सुरेंद्र जाधव, अशोक मोहिते, जयवंत जाधव, अनेक मान्यवर, विभागीय शाखांचे आजी माजी पदाधिकारी, शाखा क्रमांक पाच खरवली विभाग चे आजी माजी पदाधिकारी, उमरोळी बौद्धजन सेवा संघ, नवयुवक बौद्ध सेवा संघ स्थानिक, मुंबई, महिला मंडळ उमरोळी, बौद्ध उपासिका स्वाती गायकवाड, धम्माचारी अमरादित्य, शाखेचे अध्यक्ष विवेक जाधव, उपाध्यक्ष राजेश कासारे, सचिव अमोल मोहिते, दुय्यम सचिव नंदू कांबळे, खजिनदार रोहित सकपाळ, ऑडिटर संतोष मोरे, संदेशवाहक निलेश जाधव, विठ्ठल जाधव, प्रकाश जाधव, शैलेश जाधव, शेखर शिर्के, सुदर्शन जाधव, किरण जाधव, दिनेश जाधव, संदिप जाधव, प्रशांत शिर्के, राजेश जाधव, विजय सकपाळ, पत्रकार गौतम जाधव, पत्रकार हरेश मोरे, पत्रकार विश्वास गायकवाड, माजी अध्यक्ष गणेश मोहिते, निलेश साळवी,संदेश साळवी, सुरेंद्र जाधव, ॲड जयेश पवार, अरविंद मोरे, सुरेश कासारे, गौतम कासारे, रविंद्र कासारे, अशोक कासारे, उमेश कासारे , मनोज घोगरे, नितीन कासारे, आविष्कार गायकवाड आणि खरवली विभागातील उमरोळी, खरवली, सुरव, पेण, बोरघर, आमडोशी येथील असंख्य धम्म उपासक, उपासिका, आजी माजी पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
No comments:
Post a Comment