म्हारळ पोलीस चौकीच्या पोलीसांची धडाकेबाज कामगिरी, मुंबईतून पळालेल्या सराईत आरोपींला केले जेरबंद!
कल्याण (संजय कांबळे) सुमारे ३०ते ४० गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार मुंबई पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जातो आणि मुंबई पोलीस कल्याण तालुका पोलीसांना मदत करण्याची विनंती करतात. कोरोनाच्या संकटांची तमा न बाळगता म्हारळ पोलीस चौकीचे सर्व पोलीस आपले कसब पणाला लावून अखेर या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळतात. हे नक्कीच कौतुकास्पद आहे.
मानपाडा पोलीस ठाण्याचे हद्दीत घरफोडी करत असताना शाखा उर्फ सुशील जगरिश वाल्मिकी वय २८ याला पकडण्यात आले होते. त्याला कोर्टात हजर केले असता न्यायालयाने जामीन न दिल्याने आधारवाडी जेल ला पाठविण्यात आले होते. त्याची तब्येत बिघडली असल्याने त्याला मुंबई येथील जेजे रुग्णालयात उपचारासाठी नेले जात असताना तो जेजे पोलीस ठाण्याचे पोलीसांना चकवा देऊन फरार झाला होता. याच्यावर घरफोडी व इतर असे गंभीर ३०ते४० गुन्हे दाखल असल्याने हा सापडणे आवश्यक होते. तसे झाले नसते तर ८ते १० पोलिसांची गच्छंती ठरलेली होती. शिवाय मुंबई पोलिसांनी या आरोपींला पकडण्यासाठी मदत करण्याचे पत्र दिले होते सर जेजे मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याचा सीआर नं १४७ २०२० असा आहे त्यामुळे ल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हारळ पोलीस चौकीचे इन्स्पेक्टर बंजरंग रजपूत यांनी त्यांचे सहकारी ऐ डी पाटील, पो काॅ, माडोळे, पो काॅ राहूल गायकवाड, पो ना सारसकर, आहेर आदीनी सापळा रचून सुर्यानगर कचरा डेपो जवळ यांच्या वर झडप घालून पकडला. त्यामुळे शहर पोलीसांची बेअब्रू वाचली.
म्हारळ पोलीस चौकीचे इन्स्पेक्टर बंजरंग रजपूत आणि त्यांच्या या टिमच्या कामगिरी चे परिसरातून कौतुक होत आहे.

No comments:
Post a Comment