Saturday, 25 July 2020

"जि.प.उपाध्यक्ष सुभाषदादा पवार यांनी दिली आरोग्य केंद्रांना भेट"!

"जि.प.उपाध्यक्ष सुभाषदादा पवार यांनी दिली आरोग्य केंद्रांना भेट"!


*प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्या घेतल्या जाणून*


मुरबाड (मंगल डोंगरे )
कोरोना पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांची उपचारासाठी ससेहोलपट होऊ नये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाषदादा पवार यांनी मुरबाड तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्राना भेट दिली.
मुरबाड तालुक्यात असणाऱ्या म्हसा, धसई, तुळई, नारीवली, आदी प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा आरोग्य केंद्राना भेटी देऊन येथील समस्या जाणून घेतल्या.ज्या ठिकाणी डॉक्टर कमी आहेत अश्या ठिकाणी बीएएमएस् डॉक्टर देण्याच्या सूचना केल्या तुळई या ठिकाणी पाण्याची गैरसोय होत असल्याने त्या ठिकाणी तात्काळ पाण्याची व्यवस्था करण्यासाठी अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. म्हसा प्राथमिक आरोग्य केंद्राला जागेची समस्या निर्माण झाली असून जागेचा प्रश्न सोडविण्याच्या सूचना केल्या. धसई या ठिकाणी कामकाज व्यवस्थित करण्यासंदर्भात सूचना दिल्या. तर या आरोग्य केंद्रा अंतर्गत असणारे २० कोरोना रुग्ण बरे झाले असल्याने समाधान व्यक्त केले.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी मनीष रेंगे,मोहन भावार्थे यांसह कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...