Tuesday, 6 October 2020

मुरबाड च्या समस्या सुप्रिया सुळेंच्या दरबारी !! *राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दिपक वाघचौडेनी दिले निवेदन *

मुरबाड च्या समस्या सुप्रिया सुळेंच्या दरबारी !!
*राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दिपक वाघचौडेनी दिले निवेदन *


मुरबाड (मंगल डोंगरे ) : मुरबाड नगर पंचायत चा का र्यकाळ लवकरच संपणार असल्याने जसजशी निवडणुक जवळ-जवळ येत आहे. तसतसा सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढु लागला आहे.प्रत्येक जण सक्रिय होत आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे नुकताच भाजपने अनेक तरुणांना नियुक्ती पत्र देवून आगामी न.प.च्या कामाची सुरुवात करण्याचे आदेश दिल्याचे बोलले जात आहे. तर दुसरी कडे मुरबाड करांच्या विविध समस्यांवर आंदोलने करणारी मनसे ठामपणे रंणांगण गाजविण्याची तयारी दिसून येत आहे. तर नगरपंचयतीच्या स्थापने पुर्वी पासून मुरबाड शहरात नवतरुणांच्या मनमनात भगवे रक्त सळसळविणारी शिवसेना आपली रणनिती आखुन निवडणुकीच्या आखाड्याची वाट पहात असुन ,कधी नव्हे ति तरुणांची फळी घेवून राष्ट्रवादीचे तरुण तडफदार शहर अध्यक्ष दिपक वाघचौडे हे विविध उपक्रमातुन केवळ शहरच नव्हे तर तालुक्यातील समस्या सोडविण्यासाठी जिवाचे रान करीत असतना दिसत असुन नुकताच त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यालय मुंबई येथे भेट घेवून तालुक्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी निवेदन दिले आहे. ज्या मध्ये मुरबाड औद्योगिक नगरी प्रवेश द्वाराची तुटलेली  कमानी बांधून तिला माजी महसूल मंत्री  स्वर्गीय शांताराम भाऊ घोलप यांचे नाव देण्यात यावे.अल्प भुधारक शेतकऱ्यांना शेतकरी संघाचे सदस्य करून शेतकऱ्यांना मिळणारे सर्व लाभ द्यावेत.मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील बंद कारखाने सुरु करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. तसेच सुरु असलेल्या छोट्या-मोठ्या कंपन्यांमधली ठेकेदारी बंद करून स्थानिक कामगारांना कायमस्वरुपी सेवेत सामावुन घ्यावेत.त्यांना किमान वेतन लागु करावे. ज्यामुळे मुरबाड सारख्या तालुक्याचा विकास खुंटला ति ग्रामीण भागातील विकासाची जिवन दाहिनी, म्हणजेच मुरबाड रेल्वे सुरु व्हावी.मुरबाड तहसीलदार कार्यालयात जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था, व अपंगांसाठी लिफ्टची व्यवस्था व्हावी.सरकारी कार्यालयात विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी नागरिकांची होणारी पायपिट थांबवुन तात्काळ दाखले देण्याची व्यवस्था करावी.अशा मागण्याचे निवेदन दिले असताना, सदरच्या निवेदनाची दखल घेत ,ते संबंधित मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी यांना तात्काळ रवाना करण्याचे ठोस आश्वासन खा.सुप्रियाताई सुळे यांनी दिले आहे.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...