Tuesday, 6 October 2020

"हाथरस हत्याकांड विरोधात कल्याण व पनवेल तहसीलदारां मार्फत राष्ट्रपतींना अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे निवेदन"!!

"हाथरस हत्याकांड विरोधात  कल्याण व पनवेल तहसीलदारां मार्फत राष्ट्रपतींना अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे निवेदन"!!


पनवेल - (प्रतिनिधि) : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील चंपा या गावातील युवती कालकथीत मनिषा बाल्मिकी हीचे वर चार मनुवादी विचारसरणीच्या नराधमांनी अमानवी पध्दतीने बलात्कार केला तीला मारहाण करुन घटनेची वाच्यता तीने करु नये म्हणून तीची जिभ कापली, मणका मोडला. 


मानवजातीला काळीमा फासणारे घृणास्पद कृत्य मनुवादी नराधमांनी केलेले असुन या घटनेला पाठीशी घालणाऱ्या उत्तर प्रदेशातील पोलीस यंत्रणेने बेकायदेशीर कृत्य केलेले असल्याने सबंधित पोलीस प्रशासनातील जबाबदार अधीकारी व कर्मचारी यांना सदर गुन्ह्यात सहआरोपी करुन अराजकता माजवणारे उत्तरप्रदेश राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी. तसेच  सदर गुन्हा जलदगती न्यायालयात चालवून गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रपतींना केलेल्या निवेदनात करण्यात आली असुन सदर घटनेचा सर्वसामान्य नागरिकांच्या व संघटनेच्या वतीने  जाहीर निषेध नोंदविण्यात आला आहे.सदर मागणी व निषेध निवेदन संघटनेचे प्रदेश अध्यक्ष *रविंद्रदादा जाधव* यांचे आवाहनानुसार व अअनिस चे प्रदेश सरचिटणीस *महेंद तथा अण्णा पंडित* यांचे मार्गदर्शनाखाली कल्याण तहसीलदार *दिपकआकडे* यांना संघटनेचे जिल्हा संघटक *अमीत साळवे* यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. या वेळी दिपक मागाडे, सुनील भोसले, कैलास पवार यांचे सोबत प्रदेश सरचिटणीस महेंद्र तथा अण्णा पंडित इ. कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच पनवेल तहसीलदार कार्यालयात कोकण प्रदेशाध्यक्ष *संतोष चाळके* व *अण्णा पंडीत* यांचे नेतृत्वाखाली तहसीलदार *अमित सानप* यांचे अनुपस्थितीत निवडणूक नायब तहसीलदार *नालंद गांगुर्डे* यांनी निवेदन स्विकारले. निवेदनावर पनवेल तालुकाध्यक्ष राज भोईर, कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष चाळके, प्रदेश सरचिटणीस महेंद्र तथा अण्णा पंडित, दिपक मागाडे, ममता जोहर, मनिष प्रजापती, रोशन गडगे, कुणाल भोईर, विक्रम फूलोरे, राहुल गायकवाड, परेश भोईर, यश जोहर, कुवर पाटील, सुयोग गडगे, गणेश कांबळे, कैलास पवार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संबंधितांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन  शांतीचे व संयमाचे प्रदर्शन घडविले.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...