Tuesday, 6 October 2020

म्हारळ येथे ओबीसी मोर्चा जिल्हाच्या वतीने सेवा सप्ताह निमित्त कोरोना योद्धा चा सत्कार!

म्हारळ येथे ओबीसी मोर्चा जिल्हाच्या वतीने सेवा सप्ताह निमित्त कोरोना योद्धा चा सत्कार! 


कल्याण (संजय कांबळे) : भाजपा ओबीसी  मोर्चा उल्हासनगर जिल्हाच्या वतीने ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष सुभाष तानवडे व महिला मोर्चा अध्यक्षा श्रीमती स्नेहलता मुकेश कलशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली म्हारळ  येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती व सेवा सप्ताह निमित्त सफाई कामगार, डॉक्टर आशा वर्कर, इ चा कोरोना योध्दा चा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


या कार्यक्रमाला माजी महापौर श्रीमती मीना कुमार आयलानी, अनिल पंडित, प्रदेश सचिव ओबीसी मोर्चा श्री, हेमंत भास्कर ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यालय प्रमुख आणि प्रभारी कल्याण व उल्हासनगर जिल्हा श्रीमती. मंगला चांडा महासचिव भाजपा ठाणे पालघर विभाग माजी उपाध्यक्ष उमेश सोनार, जिल्हा उपाध्यक्ष,दिलीप फुंदे ,अतिश म्हात्रे, कृष्णा पुजारी, कामगार सेल अध्यक्ष ऋषिकेश मिश्रा, मंडळ क्र 6, अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य योगेश देशमुख ग्रामपंचायत सदस्य श्रीमती पौर्णिमा म्हस्के ओबीसी मोर्चा महासचिव उमेश पंडित, मंगेश केने, अंजनी पोद्दार सौ भावना पेडणेकर महासचिव ओबीसी महिला मोर्चा, श्रीमती सुनीता झा,श्रीमती मनीषा जाधव,श्रीमती शोभा अगणे, श्रीमती वैशाली शिरसाट, श्रीमती रेखा पवार, श्रीमती अलका रावळ, श्रीमती मंगल गाढवे, जेष्ठ समाजसेविका श्रीमती तारा झा, श्रीमती रंजना, आदी मान्यवर भाजपा जिल्हा पदाधिकारी व ओबीसी मोर्चा पदाधिकारी व महिला पदाधिकारी उपस्थित होते.


या वेळी म्हारल ग्रामपंचायत सदस्या श्रीमती पौर्णिमा म्हस्के, याची भाजपा ओबीसी मोर्चा उल्हासनगर जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्त पत्र भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव अनिल पंडित ओबीसी मोर्चा प्रभारी हेमंत भास्कर, जिल्हा अध्यक्ष सुभाष तनावडे यांच्या, हस्ते देऊन करण्यांत आले.
सदरचा कार्यक्रम ओबीसी मोर्चा जिल्हा महासचिव  मंगेश केने,ओबीसी महिला मोर्चा महासचिव श्रीमती भावना पेडणेकर यांनी विशेष मेहेनत घेऊन यशस्वी केला. यावेळी सत्कार केलेल्या कोरोना योद्धांना विचारले असता, आम्ही गेल्या काही महिन्यांपासून जीव धोक्यात घालून काम केले, कुंटूबापासून दूर राहिलो याचे चीज झाले.असे ते म्हणाले, तसेच असे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. 

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...