मुरबाड - {मंगल डोंगरे} जिल्हा परिषद ठाणे व पंचायत समिती मुरबाड यांच्या सयुंक्त विद्यमाने समाजकल्याण विभाग पंचायत समिती मुरबाड यांच्या वतीने तालुक्यातील मागासवर्गीय लाभार्थ्यांना विविध साहित्याचे वाटप पंचायत समिती मुरबाड येथे स्व.शांताराम भाऊ घोलप सभागृहात आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने भजनासाठी लागणारे वाद्यवृंद मृदूंग, ढोलकी, हार्मोनियम, टाळ ,विणा, तबला, असे 07 संच तर समाज मंदिरासाठी विवीध प्रकारची भांडी 12 संच, मंडप साहित्य 09 संच, बॕंन्जो - डी.जे.17 संच, व्यायामशाळा साहित्य 10, अभ्यासिका साठी साहित्य 15 संचचे वाटप करण्यात आले. ज्या लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर केले होते त्यांना या साहित्याचा लाभ मिळाला आहे.
तालुक्यातील कोणत्याही नागरिकांनी आपल्या समस्या निसंकोचपणे मांडाव्या त्या निश्चित पणे सोडविल्या जातील असे प्रतिपादन यावेळी आमदार किसन कथोरे यांनी केले .
या कार्यक्रमासाठी सभापती श्रीकांतजी धुमाळ ,उपसभापती सौ. अरुणा खाकर ,गटविकास अधिकारी रमेश अवचार, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती सौ.नंदाताई उघडा, जिल्हा परिषद सदस्य, प्राजक्ता भावार्थे, रेखाताई कंटे, किसन गिरा माजी उपसभापती सिमा घरत, अनिल देसले, दिपक पवार, विस्तार अधिकारी सुरोशे यांच्यासह पंचायत समितीचे व जि.प.चे सर्व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूञसंचालन प्रा.शिक्षक भालचंद्र गोडांबे यांनी केले.



No comments:
Post a Comment