कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर तालुका आरोग्य पथकाची म्हारळ ग्रामपंचायतीला भेट !
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यात वाढणा-या कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर कल्याण पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भारत मासाळ यांनी संपूर्ण आरोग्य पथकासह आज म्हारळ ग्रामपंचायतीला भेट देऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतला.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचे सांगितले जाते आहे. तसे पेंशट देखील आढळून येत आहेत. मागील वर्षी कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या म्हारळ ग्रामपंचायतीचे हद्दीत सुमारे ३०० च्या आसपास कोरोनाचे रुग्ण होते. तर वरप मध्ये ९२, कांबा २५ अशी आकडेवारी होती. दुर्दैवाने आता राज्यात दुसरी लाट येऊ पाहत आहेत. शेजारी असलेल्या कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या हद्दीत कोरोना ने कहर केला आहे. दररोज ५००/६०० पेंशट सापडत आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या ग्रामपंचायत हद्दीत भिती व्यक्त केली जात आहे. १ मार्च ते आजपर्यंत म्हारळ ग्रामपंचायतीचे हद्दीत सुमारे २२ पेंशट कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे म्हारळ ग्रामपंचायतीची लोकसंख्या पाहता वेळीच उपाययोजना करण्यासाठी तसेच ग्रामपंचायत व आरोग्य विभागाचे कर्मचारी, अधिकारी यांच्यात समन्वय रहावा म्हणुन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भारत मासाळ हे संपूर्ण आरोग्य टिमला घेऊन म्हारळ ग्रामपंचायत मध्ये आले होते. यामध्ये दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ रमेश राठोड, कार्यालयीन कर्मचारी मोहन गायकवाड, आरोग्य सेवक कैलास तालिगोटे, आदींचा समावेश होता. तर म्हारळ ग्रामपंचायतीचे सरपंच प्रगती प्रकाश कोंगिरे, उपसरपंच अश्विनी निलेश देशमुख, विदीका गंभीरराव, सदस्य अॅड दिपक आहिरे, किशोर वाडेकर, पत्रकार संजय कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ भारत मसाळे यांनी सांगितले की म्हारळ गावाच्या लोकसंख्येचा विचार केला तर येथे धोबीघाट, बौद्धवाडा, म्हारळपाडा, गावदेवी आदी ठिकाणी आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे परंतु जागेअभावी अडचणी येत आहेत. जागा उपलब्ध करून दिल्यास येथे अॅन्टीजेन चाचणी सुरू करण्यात येईल असे ही त्यांनी सांगितले. तर कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी ग्रामपंचायती मार्फत कडक उपाययोजना करण्यात येणार असून यामध्ये मास्क न वापरणारे विरोधात दंडात्मक कारवाई, दुकानदारांना नोटीस बजावणे, एक आड एक दिवस दुकाने बंद ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी गर्दी जमविण्या-या विरोधात पोलीस कारवाई बरोबरच जनजागृती करण्यात येणार असल्याचे सरपंच प्रगती प्रकाश कोंगिरे व उपसरपंच अश्विनी निलेश देशमुख यांनी सांगितले. यावेळी आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी समन्वयाने काम करण्यावर एकमत झाले तसेच या भागाला कोणत्याही परिस्थितीत कोरोना संदर्भात अडचण येणार नाही असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भारत मसाळे यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment