Tuesday, 6 April 2021

म्हारळ ग्रामपंचायतीचा दणका, रोज वाईन अखेर बंद? ग्रामीण भागात कोरोना केअर सेंटर लवकरच सुरू - 'जिल्हाधिकारी' !

म्हारळ ग्रामपंचायतीचा दणका, रोज वाईन अखेर बंद? ग्रामीण भागात कोरोना केअर सेंटर लवकरच सुरू - 'जिल्हाधिकारी' !


कल्याण, (संजय कांबळे) : कोरोनाची कोणत्याही प्रकारची तमा अथवा भिती न बाळगता लाॅकडाऊन मध्ये 'स्टाॅक' करुन ठेवण्यासाठी कल्याण मुरबाड महामार्गावरील म्हारळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या रोज वाईन दुकानात तळीरामांची सकाळ पासून मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. परंतु याची ग्रामपंचायतीला माहिती मिळताच ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, व सर्व सदस्य यांनी येथे धडक दिली व अखेर हे दुकान बंद केले. यामुळे सकाळ पासून मदिरेसाठी जीव धोक्यात घालून गर्दी करणा-या तळीरामांची मोठ्या प्रमाणात निराशा झाली.


राज्यात कोरोनाची दुसरी लाट उसळली आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेप्रमाणे आता तालुक्यातील म्हारळ, वरप कांबा घोटसई, खडवली, खोणी, म्हसकळ, बापसई, जांभूळ, अनखर आदी ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाचे पेशंट वाढत आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शासन वारंवार कोरानाचे नियम पाळण्याचे अवाहन करित आहे. पण नागरिकांकडून याचे उल्लंघन होताना दिसत आहे.
शासनाने कोरोनाच्या संकटामुळे राज्यात लाॅकडाऊन ऐवजी कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये संचारबंदी, जमावबंदी याचाही समावेश आहे. याच धर्तीवर म्हारळ गावात नियमाचे काटेकोरपणे अंमलबजावणी कशी करायची याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच श्रीमती प्रगती प्रकाश कोंगिरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपसरपंच अश्विनी निलेश देशमुख, वेदिका विवेक गंभीरराव, किशोर वाडेकर, अॅड दिपक आहिर, निलिमा म्हात्रे, बेबीताई दत्तू सांगळे, सदस्य प्रमोद देशमुख, नंदा म्हात्रे, मंगला इंगळे, ग्रामविकास अधिकारी नितीन देशमुख आदी उपस्थित होते.या बैठकीत म्हारळ ग्रामपंचायतीचे हद्दीत झपाटय़ाने वाढत असलेला कोरोना यावर चर्चा सुरू असतानाच कल्याण मुरबाड महामार्गावरील रोज वाईन दुकानात तळीरामांची मोठ्याप्रमाणात गर्दी झाल्याचे ग्रामपंचायतीच्या लक्षात येताच संरपच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी रोज वाईन दुकानाकडे मोर्चा वळवला तेव्हा येथील गर्दी बघून खरेच कोरोनाची भिती लोकांना आहे या बाबत सगळेच अवाक झाले. त्यामुळे अखेर सर्वांनी रोज वाईन मालकाला फैलावर घेतले व दुकान बंद करण्यास भाग पाडले. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा रौद्र रूप बघून वाईन मालकाची पाचावर धारण बसली. असेच कडक धोरण व अमलबजावणी गावात राबविणार असल्याचे सरपंच प्रगती प्रकाश कोंगिरे यांनी सांगितले. 
तर वाढणारी कोरोनाची संख्या व तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना न मिळणारे बेड याबाबत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना विचारले तर ते म्हणाले कल्याण तालुक्यातील वरप आणि भिवंडी तालुक्यातील सावाज येथील कोरोना कोविड सेंटर एक दोन दिवसात सुरू करण्यात येईल.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...