धरणे रिकामिच तरीही नदीस आलेला पुर नैसर्गिक की मानवनिर्मित, नुकसानीस जबाबदार कोण ?
कल्याण, (संजय कांबळे) : नुकताच कल्याण तालुक्यातील चारही नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक सखल भागात पाणी साचून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नद्यांवरील पुल, शेतीचे बांध, रस्ते वाहून गेले, विशेष म्हणजे हे सर्व घडले ते डोंगर माथ्यावर, टेकड्या वर पडलेल्या पावसामुळे, कारण या नद्यांवरील धरणें तर अजून भरलेली नाहीत, मग प्रश्न निर्माण होतो, हा पुर नैसर्गिक होता कीं मानवनिर्मित? व याला जबाबदार कोण?
कल्याण तालुक्यात उल्हास, बारवी, काळू आणि भातसा अशा चार नद्या आहोत, यातील उल्हास नदीवर बारवी डँम आहे, भातसावर पिसे डँम व भातसा धरण आहे, तर काळू व बारवीवर छोटेमोठे डँम, बंधारे आहेत,
नैसर्गिकरीत्या पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधात कोणी आला तर तो त्याला जमिनदोस्त करुन उखडून टाकतो, २००५ चा महापूर पुर्ण पणे नैसर्गिक होता, यावेळी सलग अतिमुसळधार पर्जन्यवृष्टी झाली होती, तसेच सर्व डँम व धरणे तुंडूब भरल्याने त्यांचे सगळे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे सर्वत्र पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी जिवीत व वित्तहानी अतोनात झाली होती, परंतु आताची म्हणजे२२जुलै २०२१ची स्थिती वेगळी आहे, आता मुसळधार पाऊस पडला असला तरीही बारवी डँम, भातसा धरण अजूनतरी रिकामे आहे, केवळ नदी परिसरातील घाटमाथा, डोंगर, टेकड्या, या ठिकाणी पडलेल्या पावसामुळे पुर आला, मग हा नैसर्गिक होऊ शकतो का?
आजचे चित्र पाहिले तर केवळ उल्हास नदीचा विचार केला तर, म्हारळ, वरप, कांबा, रायते, आपटी, बदलापूर, कर्जत, ते इकडे बारवी डँम पर्यंत, नदीच्या दोन्ही बाजूला अगदीच नदीच्या पात्रात मातीचे भराव टाकून बांधकामे, फार्म हाऊस, भिंती बांधल्या आहेत, त्यामुळे दिवसेंदिवस नदीचे विस्तृत पात्र एखाद्या नाल्यासारखे झाले आहे, जी परिस्थिती उल्हास नदीची तीच स्थिती काळू व भातसाचीही, असे केवळ नदीच्या बाबतीत नाही तर गावागावातील नाले, गटारे बघा, जागेचा भाव गगनाला भिडल्याने नैसर्गिक मोठ मोठे नाले आज एक दिडफुटांच्या गटारांच्या स्वरूपात दिसत आहे.
म्हारळ, वरप, कांबा येथे तर काही दिवसांनी गटारे बघायलाही मिळणार नाहीत, काही भूमाफियांनी गटारे, नाले यांचे मार्ग बदलले आहेत, त्यामुळे डोंगर, टेकड्या वरून वाहत येणारे पाणी कोठे जाणार, बिल्डर मंडळी नी जागा घेऊन५/१०फुटांची भरणी केल्याने मग हे पाणी गोरगरिबांच्या घरात, चाळीत घुसते व त्यांचे संसार बुडतात.
केवळ कल्याण तालुक्याचा विचार केला तर नदीच्या पुरनियत्रंण रेषेच्या आतमध्ये शेकडो बांधकामे आहोत, ही सर्व कोणत्या ना कोणत्या वशिलेबाजी करणाऱ्या लोकांचीच आहोत, कोण मंत्री आमदार, खासदार, महापौर, नगरसेवक, अध्यक्ष, यांच्या जवळचा तर कोण एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा नजदिकवाला त्यामुळे कारवाई कोणी, कोणावर करायची? हा प्रश्न निर्माण होतो. सगळेच एकमेकांत गुंतलेले, परंतु याची मोठी किंमत मात्र सर्व सामान्य जनतेला मोजावी लागते, मग ती पुर असो,दरडी कोसळणे असो, भूसख्खलन असो अथवा ओला दुष्काळ असो.
नुकत्याच आलेल्या पुरामुळे, खडवली येथील भातसापूल, रायते पुल, टिटवाळा जवळील रुंदा पुल, कल्याण मुरबाड रस्ता, म्हारळ, वरप, कांबा, रायते, आदी गावातील घरात पाणी घुसल्याने झालेले नुकसान, काकडपाडा, उशीद, फळेगाव, आपटी, पळसोली, रायते, आदी गावातील शेतीचे बांध वाहून गेल्याने झालेलें नुकसान, याला नैसर्गिक आपत्ती म्हणता येईल का? याचा आतातरी विचार व्हायला हवा, हे मानवनिर्मित च संकट आहे, आणि याला 'माणूसच' जबाबदार आहे, अशा माणसातील "राक्षसाचा" वेळीच बंदोबस्त करायला हवा, अन्यथा नुकसानीचे पंचनामे होतील,नुकसानभरपाई मिळेलही, पण ती घेण्यासाठी आपण "जिंवत" राहू याची कोण गॅरंटी देणार याचा सुज्ञ ग्रामस्थांनी विचार करावा.



No comments:
Post a Comment