बहुजन रयत परिषदेच्या तालुकाध्यक्ष पदी सुरेश कांबळे तर शहराध्यक्ष पदी जितू कढरे....!
अमळनेर : माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे प्रणित बहुजन रयत परिषदेच्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी तालुक्यातील मातंग समाजातील नैतृत्व सुरेश हिरामण कांबळे यांची निवड झाली आहे. तर शहराध्यक्ष पदी जितू शंकर कढरे यांची निवड झाली. ही निवड आज परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरसे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. माजी तालुकाध्यक्ष संजय मरसाळे यांचे कोरोनाने निधन झाले असल्याने तालुकाध्यक्ष हे पद रिक्त होते. म्हणून शहराध्यक्ष पदाची धुरा सांभाळत असणारे सुरेश कांबळे यांना तालुकाध्यक्ष पद देण्यात आले आहे. तर शहराध्यक्ष हे पद जितू कढरे यांना देण्यात आले आहे. कांबळे व कढरे हे अमळनेर तालुक्यातील मातंग समाजाचे लढवय्ये कार्यकर्ते आहेत. त्यांच्या निवडीने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:
Post a Comment