भिवंडीतील अंजूरफाटा उपवाहातूक शाखेचे निरीक्षक कल्याणजी घेटे यांनी केली रस्त्याची डागडुगी.!!
भिवंडी, दिं.24, अरुण पाटील, (कोपर) :
गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या सतत धार पडणाऱ्या पावसामुळे अंजूरफाटा वाहतूक शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्याची संपूर्ण वाट लागली आहे.या मुख्य रस्त्यामध्ये मोठ मोट्ठे खड्डे पडले असून त्याचा त्रास वाहन चालकांना होत असल्या कारणाने त्याची दखल नारपोली -अंजूरफाटा उपवाहातूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कल्याणजी घेटे यांनी राहनाळगाव येथील स्व.राम पाटील चौका जवळील रस्त्यातील खड्डे स्वतः जेसिबी च्या साहाय्याने बुजवून घेतले आहे.
नारपोली -अंजूरफाटा उपवाहतूक शाखेच्या अंतर्गत फार मोठ्ठा गोडाऊन पट्टा येत असून या ठिकाणी जिल्ह्यातून, राज्यातून व परराज्यातून फार मोठ्ठया प्रमाणावर जड -अवजड वाहनांची वर्दळ असते तसेच गेल्या काही दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्याची चाळण होऊन रस्त्यात खड्डे पडले आहेत.तसेच सद्या सुरु असलेल्या एम.एम.आर.डी.ए. च्या मेट्रोच्या पुलाच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे या परिसरातली अंजूरफाटा -कशेळी व अंजूरफाटा -माणकोली या रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी होऊन त्याचा फटका वाहन चालकांना नेहमी होत असतो.
त्या कारणाने वाहतूक निरीक्षक श्री. कल्याणजी घेटे यांनी स्वतःहाच या रस्त्यावरील पडलेले खड्डे बुजवाण्याचे काम हाती घेतले असून त्यांनी स्व. राम पाटील चौका जवळून या कामाला सुरुवातही केली आहे.त्यांच्या या कामामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यामुळे आता वाहन चालकांना काही प्रमाणात समाधान वाटले आहे.
(रस्त्याची डाग डुगी करताना अंजूर फाटा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कल्याणजी घेटे)

No comments:
Post a Comment