राज कुंद्राच्या अडचणीत वाढ,बसणार ED चा दणका; परदेशातील आर्थिक व्यवहारांची होणार चौकशी.!
अरुण पाटील, भिवंडी, (कोपर), दि.24 :
पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राची कसून चौकशी केली जात आहे. दररोज नवनवे खुलासे होत असल्यामुळे राजच्या अडचणींत वाढ होत आहे. नुकतीच क्राईम ब्रांचने त्याच्या आफिस आणि घरात धाड टाकली.त्यानंतर आता त्याचे बँक अकाऊंट देखील तपासून पाहिले जात आहेत. या प्रकरणात आता सक्तवसुली संचालनालयाने (ED) उडी घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता ईडी देखील राजवर कारवाई करणार आहे.
राज लंडनमधील केनरिन नामक एका कंपनीसाठी या पॉर्नपटांची निर्मिती करत होता. ही कंपनी भारतात हॉटशॉट नावाचं एक अॅप चालवते. या अॅपच्या माध्यमातून त्याने कोट्यवधी रुपयांची कमाई केली अशी शंका ईडीला आहे. त्यामुळे FEMA अंतर्गत ED आपला तपास सुरु करणार आहे. त्यामुळे लवकरच राजचे परदेशातील आर्थिक उलाढाली देखील जगासमोर येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हॉटशॉट अँपवर व इतर OTT प्लॅट फॉर्मप्रमाणे महिन्याचं वगैरे सबस्क्रिप्शन मिळत नाही. तर प्रेक्षकांना प्रत्येक चित्रपट किंवा सीरिजसाठी वेगळे पैसे द्यावे लागतात. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार राजने या अॅपवरील अश्लील व्हिडीओंच्या माध्यमातून जवळपास 500 कोटी रुपयांचा नफा आतापर्यंत मिळवला आहे. इंटरनेटवर हजारो पॉर्न वेबसाईट कार्यरत आहेत. गुगलच्या एका सर्वेनुसार भारतातील इंटरनेट युजर सरासरी 8 मिनिटं 23 सेकंद अशा वेब साईटवर घालवतो. या पार्श्वभूमीवर हॉटशॉटने कमी वेळात मोठ्या प्रमाणावर सबस्क्राईबर्स मिळवले होते. अन् त्यामधून नफा देखील कोट्यवधींचा मिळत होता.

No comments:
Post a Comment