अंध विद्यार्थ्यांनीच्या लसीकरणाने विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे झाले उद्घाटन, वरप येथील सेक्रेट हार्ट स्कुल ठरली तालुक्यातील पहिली शाळा !!
कल्याण, (संजय कांबळे) : देशासह राज्यात कोरोना व नंतर ओमायक्राँँन ने पुन्हा डोके वर काढले असून या सभांव्य तिसऱ्या लाटेला रोखायचे असेल तर लसीकरण करण हा एकच सर्वोतम पर्याय असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणने आहे व यासाठी शासनाने १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरण करणास प्राधान्य दिले आहे, या साठी राज्यात आज पासून लसीकरण सुरू झाले आहे, कल्याण तालुक्यातील वरप येथील सेक्रेट हार्ट शाळेच्या अंध विद्यार्थ्यांनी रोशनी बात्रा हिने लस घेऊन याचे उद्घाटन केले.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भारत मासाळ, शाळेचे व्यवस्थापक अलबिंन अंथोनी, ठाणे जिल्हा परिषदेचे निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री नाईक, आणि वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.
सध्या राज्यात ओमायक्राँने धुमाकूळ घातला आहे, अगदी कल्याण ग्रामीण भागात देखील याने डोके वर काढले आहे, त्यातच याचा धोका विद्यार्थ्यांना अधिक असल्याने शासनाने राज्यात सर्वत्र आजपासून म्हणजे ३ जानेवारी पासून १५ त १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज कल्याण पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने कल्याण तालुक्यातील, वरप येथील सेक्रेट हार्ट स्कुल, गोवेली येथील जीवनदिप महाविद्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र, खडवली येथे लसीकरण आयोजित केले आहे.
यातील आज सकाळी वरप येथील सेक्रेट हार्ट स्कुल मध्ये अंध विद्यार्थ्यांनी रोशनी बात्रा हिने प्रथम कोव्हाँसीन लस घेऊन यांचे उद्घाटन केले, यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ भारत मासाळ, शाळचे व्यवस्थापक अलबिंन अंथोनी, निवृत्त डेप्युटी श्री नाईक, शाळेच्या प्राचार्या, शिक्षक,कर्मचारी, व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी टाळ्यांच्या गजरात या विद्यार्थ्यांनी चे स्वागत केले,यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भारत मासाळ यांनी लसीकरण कसे महत्त्वाचे आहे, काय काळजी घेतली पाहिजे, तालुक्यात किती लसीकरण झाले आहे, हे सांगून वरप येथील सेक्रेट हार्ट शाळेचे कौतुक केले.
तर शाळेचे व्यवस्थापक अलबिंन अंथोनी यांनी सांगितले, सेक्रेट हार्ट स्कुल सर्वात आघाडीवर असते,शिक्षण, कला क्रीडा, क्षेत्रात राज्यात टाँप स्कुल असून आतापर्यंत शाळेला अनेक देश विदेशातून पारितोषिके, पुरस्कार मिळाले आहेत, त्यामुळे सर्वच आघाड्यांवर वन नंबरवर असणाऱ्या या शाळेने कोव्हिड विरोधात लढाईत देखील नंबर वन असावे म्हणून तालुक्यातील पहिली लसीकरणाची सुरुवात या शाळेतून केली आहे, शाळा विद्यार्थ्यांचे शंभर टक्के लसीकरण करणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले, तर आमचे लसीकरण केल्या बद्दल शालेय विद्यार्थीनी अलबिंन सर यांचे आभार मानले, हे लसीकरण यशस्वी होण्यासाठी शाळेचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, आणि आरोग्य विभागाने मेहनत घेतली.





No comments:
Post a Comment