Wednesday, 20 July 2022

तकदीर काळण यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप !

तकदीर काळण यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप !


डोंबिवली, बातमीदार : मनसे आमदार राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेदुटने गावचे कार्यसम्राट माजी सरपंच तथा डोंबिवली मनसे शहर संघटक तकदीर दशरथ काळण यांच्या वतीने हेदुटने तसेच कोळेगाव परिसरातील जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू तसेच वह्या वाटप करण्यात आले. 

शिक्षण हे वाघिणीचे दूध म्हटलं जातं ज्याने हे दूध प्यायले तो भविष्यात कधीही मागे राहत नाही. परंतु गावामध्ये मोठ्या प्रमाणात गोरगरीब लोकवस्ती असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या पालकांना आपल्या मुलांना शिक्षण देणे शक्य होत नाही. हे मनी ठेवत शिक्षणा पासून कोणताही विद्यार्थी वंचित राहता कामा नये असे म्हणत. त्यांनी दोन्ही जिल्हापरिषद शाळेमध्ये शालोपयोगी साहित्य वाटप केले. प्रभागातील ३,००० मुलांपर्यंत शालेय साहित्य पोहचवण्याचा मानस तकदीर काळन यांनी केला आहे. २० जुलै रोजी जवळजवळ ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी तकदीर दादांनी दिलेल्या सेवेचा लाभ घेतला. पुढे हा उपक्रम सुरू राहणार असल्याचे प्रतिपादन तकदीर काळण यांनी केले आहे. याआधी देखील तकदीर काळण यांनी हेदुटने गावातील विद्यार्थ्यांसाठी बायजूस ॲप इनबिल्ट असणारे टॅबलेट मोफत विद्यार्थ्यांना पुरविले होते. बायजूस ॲपमध्ये विद्यार्थ्यांना पुढील ३ वर्षाचा अभ्यासक्रम उपलब्ध असून कोळेगावातील ५०० हून अधिक संख्या असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी देखील टॅब उपलब्ध करून देण्याचा तकदीर काळण यांचा मानस असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी हेदुटने जिल्हा परिषद शाळेच्या कार्यक्रमात ॲड.. उदय गायकवाड, अनिल सर, फकीरा काळण, फुलचंद पाटील, विश्वास पाटील, चैनू पाटील, रोहिदास काळण, अनंता महाराज, समाजसेविका स्वप्नाली मॅडम आदी उपस्थित होते. तर कोळेगावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये हनुमान महाराज, भोलेनाथ पाटील, रोहित भोईर, संगीता बडक, जितेंद्र पाटील, पद्माकर पाटील, सुरेश पाटील, गोपीनाथ पाटील, दिनेश पाटील, योगेश पाटील, भूषण पाटील, हार्दिक पाटील आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती दिसून आली.



No comments:

Post a Comment

पिंपळेश्वर मंदिराची जमीन अखेर मंदिरालाच; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा !!

पिंपळेश्वर मंदिराची जमीन अखेर मंदिरालाच; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा !! डोंबिवली, संदीप शेंडगे : महसूल आणि उद्योग विभागाच्या ...