Wednesday, 26 October 2022

आयुष्यमान च्या ई कार्ड मध्ये कल्याण पंचायत समिती आघाडीवर,पाच ग्रामपंचायतीचे काम पुर्णत्वाकडे !

आयुष्यमान च्या ई कार्ड मध्ये कल्याण पंचायत समिती आघाडीवर,पाच ग्रामपंचायतीचे काम पुर्णत्वाकडे !


कल्याण, (संजय कांबळे) : ठाणे जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिदंल यांनी दिलेल्या निर्देशांनुसार कल्याण पंचायत समितीने आयुष्यमान च्या ई कार्ड नोंदणीत इतर पंचायत समितीच्या तुलनेत आघाडी घेतली असून तालुक्यातील आपटी मांजर्ली, आणे भिसोळ, बापसई आणि फळेगाव या पाच ग्रामपंचायतीचा लक्षांक पाहता या पुर्णत्वाकडे वाटचाल करीत आहेत.


आयुष्यमान या योजनेला चार वर्षे पूर्ण होत असल्याने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतंर्गत विविध आरोग्य विषयक उपक्रम सर्वत्र राबविले जात आहेत. ठाणे जिल्ह्यात भिंवडी, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ आणि कल्याण अशा ५ पंचायत समितीच्या माध्यमातून देखील आयुष्यमान भारत ई कार्ड नोंदणी ग्रामसेवक, केंद्र चालक आणि आशा वर्कर्स यांच्या प्रयत्नातून सुरू झाली आहे. कल्याण पंचायत समितीचा विचार केला तर, तालुक्यात १५ हजार ६४० इतका लक्षांक आहे, यातील १ हजार २६० मयत आहेत तर ४ हजार १७३ स्थंलातरीत झाले आहेत. २६ लाभार्थ्यांची डबल नावे आली आहेत. शिल्लक राहिलेल्या १० हजार ८५ लाभार्थ्यांची नोंदणी तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, केंद्र चालक आणि आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून सुरू आहे. यामध्ये तालुक्यातील आणे भिसोळ, आपटी मांजर्ली, बापसई आणि फळेगाव या ग्रामपंचायतीचे काम जवळपास पुर्णत्वाकडे गेले आहे. इतर ग्रामपंचायती मोठ्या असल्याने त्यांचे टार्गेट मोठे आहे. त्यामुळे त्यांचेही काम सुरू आहे.


आयुष्यमान भारत योजनेचे ई कार्ड काढण्यासाठी सीएससी केंद्रातवर जाऊन तसेच ग्रामपंचायत मध्ये जाऊन नागरिकांनी आधारकार्ड व संबधित कागदपत्रांची नोंद करावी त्यानंतर लाभार्थ्यांला ई कार्ड काढता येते.

कल्याण पंचायत समितीचे कर्मचारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, केंद्र चालक, आशा वर्कर्स आणि या सर्वाकडून अंत्यत कार्यकुशलतेने काम करून घेणारे कर्तव्यनिष्ठ गटविकास अधिकारी अशोक भवारी व त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करणारे कल्याण पंचायत समिती सभापती सौ. अस्मिता जाधव, उपसभापती भरत गोंधळे, सर्व सदस्य व सदस्यां याच्या मुळे इतर पंचायत समितीच्या तुलनेत कल्याण पंचायत समिती आयुष्यमान भारत ई कार्ड नोंदणी मध्ये आघाडीवर आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...