Saturday 17 December 2022

आयपीएस डॉ रवींद्र शिसवे हे लोहमार्ग मुंबई पोलीस आयुक्त पदी, कर्तृत्वनिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून दबदबा !

आयपीएस डॉ रवींद्र शिसवे हे लोहमार्ग मुंबई पोलीस आयुक्त पदी, कर्तृत्वनिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून दबदबा !

कल्याण, (संजय कांबळे) अंत्यंत खडतर अशा परिस्थितीशी सामना करुन जबरदस्त महत्त्वकांक्षा, अपार कष्ट, मेहनत जिद्द चिकाटी यांच्या जोरावर व आईवडिलांच्या आशीर्वादाच्या बळावर आयपीएस झालेल्या डॉ रवींद्र अंनता शिसवे यांची  'पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई येथे नियुक्ती झाली असून यामुळे त्यांच्या आपटी या गावासह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण झाले आहे.

डॉ रवींद्र शिसवे हे कल्याण तालुक्यातील आपटी या छोट्याशा खेडेगावातील, वडील अंनता शिसवे उच्च विद्याविभूषित, तर आई सौ शुभांगी शिसवे या कल्याण पंचायत समितीच्या सभापती, तरीही साधी राहनी व उच्च विचारसरनी यामुळे शेतकरी असलेले त्यांचे घर सदैव गावातील ग्रामस्थांनी भरलेले, अशाच परिस्थितीत  गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण करून ते डॉक्टर झाले, झेडपीच्या डोलखांब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काही काळ सेवा केल्यानंतर ते आयपीएस झाले, सांगली, बुलढाणा, कोकण आदी परिसरात पोलीस अधीक्षक म्हणून सेवा केलेनंतर अंत्यत कोरोनाच्या कठीण काळात त्यांनी पुणे येथे सह आयुक्त म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली, याबद्दल त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

यानंतर त्यांची बदली विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई येथे झाली. आपल्या कर्तव्यापरी अंत्यत कर्तृत्वनिष्ठ व नि:षकलंक असे अधिकारी म्हणून त्यांचा पोलीस प्रशासनात दबदबा आहे. आता नुकतीच त्यांची बदली पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई येथे झाली आहे
तत्कालीन पोलीस आयुक्त कैसर खालीद यांच्या जागी त्यांची वर्णी लागली आहे. हा बदलीचा आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम यांच्या कलम२२न(२)मधील परंतुकानुसार सर्वोच्च सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेनुसार देण्यात आला आहे. त्यामुळेही वार्ता कळताच त्यांच्या आपटी या मुळ गावासह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मध्यंतरी मुंबई लोहमार्ग पोलिसांची प्रतिमा अंत्यत मोठ्या प्रमाणात मलिन झाली होती.

मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, येथे रेल्वे पोलिसांनकडून जबरनवसूली,गोल्ड चोरी, कल्याण येथील चरस या अंमली पदार्थांची विक्री, ठाणे येथील नुकतेच घडलेले सोने प्रकरण, पालघर येथील लाच प्रकरण,विनयभंग आदी विविध प्रकारच्या घटनामुळे लोहमार्ग पोलीस कमालीचे बदनाम झाले आहेत. या सर्वावर अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक लोहमार्ग डॉ प्रज्ञा सरवदे यांनी वेळोवेळी कडक कारवाई केली होती. पण आता डॉ शिसवे हे येथे आल्याने लोहमार्ग पोलिसांची डागाळलेली प्रतिमा नक्कीच सुधारतील व अभिमान वाटावा असे रेल्वे पोलीस बळ व प्रशासन निर्माण करतील अशी अपेक्षा नव्हे तर खात्री आहे.

2 comments:

  1. अभिमान आहे साहेबांचा 👌

    ReplyDelete
  2. खूपच छान.ज्यांनी माहिती दिली त्यांचे खूपच आभार नाहीतर अशा योग्य माणसाविषयी काही कळलेच नसते.अशी माणसे पोलिस खात्याला खरोखरीच भूषणावह आहेत.

    ReplyDelete

भिवंडी मतदारसंघात बदलाचे वारे !!

भिवंडी मतदारसंघात बदलाचे वारे !! ** सर्व सामान्यांचे नेतृत्व सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांना वाढता पाठिंबा भिवंडी, प्रतिनिधी ...