Monday, 16 January 2023

महासमादेशक, उप महासमादेशक व जिल्हा समादेशक होमगार्ड यांच्या हस्ते अपघातग्रस्त होमगार्ड लक्ष्मण आखाडे यांना पंचवीस लाखांचा धनादेश सुपुर्द...

महासमादेशक, उप महासमादेशक व जिल्हा समादेशक होमगार्ड यांच्या हस्ते अपघातग्रस्त होमगार्ड लक्ष्मण आखाडे यांना पंचवीस लाखांचा धनादेश सुपुर्द... 

       बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) : दिनांक ५/९/२०२२ रोजी गणेशोत्सव काळात बंदोबस्ताकरीता खालापूर पोलीस ठाणे येथे श्री. लक्ष्मण विठ्ठल आखाडे होमगार्ड रात्र पाळीसाठी दरोडा प्रतिबंधक पथक या ठिकाणी कर्तव्यावर असताना पहाटे ०१:३० वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे येथे त्यांचा अपघात झाला होता. सदर अपघातामध्ये श्री. लक्ष्मण विठ्ठल आखाडे यांना कायमस्वरूपी अपंगत्व आले होते.
      मा.महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य, मुंबई यानी महाराष्ट्र राज्यातील होमगार्डना विमाचे संरक्षण प्राप्त व्हावे याकरीता चाळीस हजार होमगार्ड यांचे एच.डी.एफ.सी. बँकेत खाते उघडून सर्वाना विमा संरक्षण मिळवून दिले आहे. त्यांचेच प्रयत्न म्हणून आज दि. १६/०१/२०२३ रोजी जिल्हा समादेशक, होमगार्ड रायगड येथील होमगार्ड श्री. लक्ष्मण विठठल आखाडे सं.क्र १००६१००४८८६ यांचे एच.डी.एफ.सी बँकेत खाते असल्याने झालेल्या अपघातामुळे त्यांना अपगंत्व विमा संरक्षणार्तगत (Partial Disability Claim) रक्कम रुपये २५,००,०००/- (अक्षरी - पंचवीस लाख) चा धनादेश मिळाला आहे.
     आज दिनांक १६/०१/२०२३ रोजी सदरचा धनादेश श्री लक्ष्मण विठ्ठल आखाडे यांना देण्यासाठी मा. श्री भुषण कुमार उपाध्याय, (भा.पो.से.), महासमादेशक, होमगार्ड महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा.श्री. ब्रिजेश सिंह, (भा.पो.से.), उपमहासमादेशक, होमगार्ड महाराष्ट्र राज्य, मुंबई. श्री. अतुल उत्तमराव झेंडे, जिल्हा समादेशक, होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक रायगड, श्री. संदिप कोचर, व्हाईस प्रेसिडेंट कॉर्पोरेट सॅलरी एच.डी.एफ.सी. बँक व श्रीमती मंजरी सावंत, क्लेम सेटलमेंट मॅनेजर एच.डि.एफ.सी. बँक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अपघातग्रस्त होमगार्ड लक्ष्मण विठ्ठल आखाडे यांना पंचवीस लाखांचा धनादेश सन्मानपूर्वक सुपुर्द करण्यात आला.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...