पवित्र हज यात्रा-2023 साठी जाणा-या यात्रेकरूंना आवाहन...
*ऑनलाईन अर्ज भरण्याची आझाद चौक येथे सुविधा उपलब्ध*
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि. १८ : पवित्र हज यात्रा-2023 साठी जाणा-या यात्रेकरूंना जाण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची घोषणा 10 फेब्रुवारी रोजी सेंट्रल हज कमेटीने केली आहे. हज यात्रेत यात्रेकरूंना त्रास होवू नये त्यांना अर्ज भरण्याची सुविधा आझाद चौक, नैशनल प्लाईऊड व एम.एस.कन्स्ट्रक्शन, शाॅप नं.19, सहकार नगर, दर्गाह रोड, औरंगाबाद येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छूक यात्रेकरु कागदपत्रांची पूर्तता करुन अर्ज भरुन घेण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत महाराष्ट्र खिदमतुल हुज्जाज कमेटीच्या वतीने मसिउद्दीन सिद्दीकी व सरताज खान यांनी केले आहे. शेवटची तारीख 10 मार्चपर्यंत अर्ज भरता येईल.
त्यांनी पुढे बोलताना सांगितले यावेळी सेंट्रल हज कमेटीने हज यात्रेकरूंच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. 50 ते 60 हजार रुपये कमी लागणार आहे. 70 वर्ष वयाचे यात्रेकरूंना थेट हज यात्रेसाठी जाता येणार आहे. 27 फेब्रुवारी नंतर हज हाऊस खुले होणार आहे लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे. राज्य हज कमेटी हज यात्रेसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देणार आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
ऑनलाईन अर्ज करण्याची पासपोर्ट, 31 डिसेंबर पर्यंत वेलिड, पासपोर्ट फोटो, बैकग्राऊंड व्हाईट, मेडीकल टेस्ट रिपोर्ट व ब्लड ग्रुप असल्यास, सोबत जाणारे एकाचे बँक सेविंग अकाऊंट, चेक, पैनकार्ड, नाॅमिनी वारसदाराचे नाव व मोबाईल नंबर, कोविड-19 वेक्सिनेशन दोन प्रमाणपत्र, मोबाईल नंबर असे कागदपत्रे आवश्यक आहे.
यावेळी हुज्जाज कमेटीचे अध्यक्ष अहेमद पटणी, हमद चाऊस, महाराष्ट्र राज्य हज कमेटीचे माजी अध्यक्ष जी.एस.ए.अन्सारी, सलिम चिश्ती, सरपंच हय्यास सय्यद, याकुब खान, नबी पटेल एजाज खान, साजेद मौलाना, रियाजोद्दीन देशमुख, सय्यद इरफानउद्दीन, सय्यद नबील, एजाज सिद्दीकी आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment