रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी शिवजयंती निमित्त छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन...
बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी चौक,अलिबाग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी ' जय जय महाराष्ट्र माझा' 'गर्जा महाराष्ट्र माझा' या राज्यगीताचे अत्यंत उत्साहात गायन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) सर्जेराव मस्के-पाटील, अलिबाग नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती अंगाई साळुंखे तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करण्यात आली तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते.
No comments:
Post a Comment