Saturday, 24 June 2023

कल्याण मुरबाड महामार्गावर वरप येथे गँस टँकर उलटून बाईकचा चक्काचूर, सुदैवाने जिवीतहानी नाही, अर्धवट कामांचा परिणाम, अपघात मालिका सुरू !

कल्याण मुरबाड महामार्गावर वरप येथे गँस टँकर उलटून बाईकचा चक्काचूर, सुदैवाने जिवीतहानी नाही, अर्धवट कामांचा परिणाम, अपघात मालिका सुरू !

कल्याण, (संजय कांबळे) ::बहुचर्चित,वादग्रस्त असा कल्याण मुरबाड महामार्गावरील म्हारळपाडा ते पाचवामैल दरम्यानच्या सिंमेट काँक्रीटीकरण रस्त्याच्या अर्धवट कामाचा परिणाम म्हणून आज पहाटे वरपगाव बस स्टापजवळ गँस टँकर उलटून उभ्या असलेल्या मोटारसायकलचा चक्काचूर झाला, सुदैवाने तेथे कोणीही उपस्थित नसल्यामुळे जिवीत हानी झाली नाही.
तथापि म्हारळपाडा ते पाचवामैल दरम्यान रस्त्याची अनेक कामे अपुरी राहिल्याने आता अपघाताची मालिका सुरू होईल असे ग्रामस्थ बोलत आहेत. तर रस्ता अपुर्ण असताना मुख्यमंत्री,सार्वजनिक बांधकाम मंत्री, खासदार, आमदार यांचे रस्त्याबद्दल 'आभाराचे, बँनर लावल्याने परिसरात आश्चर्यासह संताप ही व्यक्त केला जात आहे.

कल्याण मुरबाड महामार्गावरील म्हारळपाडा ते पाचवामैल दरम्यान रस्त्याचे काम सुरु झाल्यापासून म्हारळ, वरप कांबा, या गावासह या मार्गावरून येजा करणाऱ्या प्रवासी, वाहनचालक, नागरिक, ग्रामस्थ यांच्या मागे 'साडेसाती, लागली आहे, खड्डे, चिखल, धूळ, पाणी, यावरून घसरून झालेले अपघात, कित्येकांना जीव गमवावा लागला तर काहींना कायमस्वरूपी अंपगत्व आले, ठेकेदार, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या विरोधात अंदोलन, मोर्चा, तक्रारी, ठेकेदार बदलाबदली पण तरीही पावसाळ्यापुर्वी नागरिक चांगला, चिखलमुक्त, खड्डेमुक्त, अपघातमुक्त रस्ता मिळेल असे वाटत होते. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही, वाहतूक कोंडी, मो-याचे अर्धवट काम, डिवायडर साठी मधोमध ठेवलेले भले मोठे खड्डे, माती चिखल,यामुळे अपघाताची शक्यता अधिक निर्माण झाली आहे.

आज पहाटे वरपगाव बसथांब्याजवळ कल्याण हून मुरबाड कडे जाणारा गँस टँकर (जी जे०६,ऐ एक्स८७७५) हा डिवायडर च्या खड्ड्यात उलटला ,बाजूला उभ्या असलेल्या बाईक वर कोसळल्याने तिचा चक्काचूर झाला, पहाटेची वेळ असल्याने सुदैवाने या परिसरात कोणीही नव्हते. त्यामुळे जिवीत हानी टळली.शिवाय या टँकर मधून गँस गळती झाली असती तर संपूर्ण गाव संकटात सापडला असता.

म्हारळपाडा ते पाचवामैल दरम्यान अनेक ठिकाणी यामध्ये म्हारळ सोसायटी, टाटा पावरहाऊस कांबा पंप,, मेरिडियन शाळा, सिएनजी पंप, पावशेपाडा बस थांबा, पाचवामैल, आदी ठिकाणी रस्त्यावर पाणी भरणार आहे, गटारे अर्धवट आहेत, डिवायडर चे काम झाले नाही, पुर्ण चार लेन झालेल्या नाहीत. सुरुवातीपासून आतापर्यंत अपघाताची मालिका सुरू आहे.
असे असताना राज्याचे मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, खासदार व आमदार याचे, रस्त्याच्या कामाबद्दल आभार, व धन्यवाद चे बँनर लावल्याने आश्चर्य तर व्यक्त केले जात आहेच, शिवाय संताप देखील बोलून दाखवला जातो आहे. तसेच आता पावसाला सुरुवात झाली आहे .म्हारळ, वरप कांबा या परिसरातील नागरिकांनी रस्त्यामुळे होणाऱ्या त्रासाला तयार रहा असे पावशेपाडा तेथील चंद्रकांत भगत यांनी बोलून दाखवले.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...