Saturday, 24 June 2023

परिवारावर बोलू नका, तुमचेही व्हॉट्सअ‍ॅप चॅट बाहेर आलेत, मी बोललो तर शवासन करावे लागेल; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना दम !!

परिवारावर बोलू नका, तुमचेही व्हॉट्सअ‍ॅप चॅट बाहेर आलेत, मी बोललो तर शवासन करावे लागेल; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना दम !!

भिवंडी, दिं,२५, अरुण पाटील (कोपर) :
         देवेंद्र फडणवीस एवढ्या खालच्या पातळीला येऊ नका. परिवार तुम्हाला देखील आहे. तुमचे व्हॉट्स अ‍ॅप चॅटही बाहेर आलेत. आम्ही त्याच्यावर अजून बोललो नाही. मी बोललो तर तुम्हाला शवासन करावे लागेल. शवासन करून नुसताच योगा डे साजरा करावे लागेल. त्यामुळे माझ्या परिवारावर बोलू नका. कारण मी माझ्या कुटुंबाबद्दल अत्यंत संवेदनशील आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी शनिवारी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
         उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पाटणा येथे बैठकीला उपस्थित राहण्यावरुन जोरदार हल्लाबोल केला होता. आज शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई येथे पदाधिकाऱ्यांचा आणि लोकप्रतिनिधी मेळावा पार पडला. यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. तर केंद्र सरकारवर कोव्हिड काळात केलेल्या कामावरुन टीकास्त्र डागले आहे.
           चौकशीच करायची असेल तर ठाणे मनपाची करा, ठाण्याचे भाजप आमदार संजय केळकर यांनी ठाणे मनपाची चौकशी करावी असे म्हटले आहे. मात्र, इथे फडणवीसांनाच किंमत नाही तर केळकरांना काय असणार असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
          जे.पी. नड्डा यांनी ओडिशामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. नड्डा यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरे बोलले की यांचा 'नड्डा' सुटतो, असे ठाकरे म्हणताच सभागृहात हशा पिकला. तर पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मेहबुबा मुफ्तींसोबतचे नरेंद्र मोदी, अमित शाह यांचे फोटो दाखवत ठाकरे म्हणाले, हे भाजपचे मुस्लिम प्रेम आहे, हा भाजप पक्ष नसून 'भाडोत्री' पक्ष आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
           ज्या सरकारचा जन्मच मुळात खोक्यांतून ते काय चौकशी करणार, असा तिखट सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना उपस्थित केला आहे. आम्ही चौकशीला घाबरत नाही. चौकशी करायची तर ठाणे मनपाची चौकशी करा. भाजपचे आमदार संजय केळकर यांनीच ही मागणी केली आहे. पण या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांचीच काही किंमत नाही, तर केळकरांची काय असणार, असा खोचक टोलाही ठाकरेंनी यावेळी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...