उंबर पाडा जिल्हा परिषद शाळेमध्ये यावर्षीचा स्वातंत्र्य दिनाचा ध्वजवंदनाचा मान इयत्ता बारावी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थी *कू.मयूर दत्तात्रय घुडे* यास मिळाला असून भादाणे झेंडावंदन उपक्रमाचे "संकल्पक संजय हांडोरे पाटील" यांच्या निर्णयाचे अनुकरण *ग्राम शिक्षण कमिटीचे अध्यक्ष एकनाथ घुडे* यांनी केले असून या निर्णया करिता पुढाकार घेऊन 'उंबरपाडा' शाळेमध्ये या गावातून 'इयत्ता दहावी बारावीला' प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते *झेंडावंदन* करण्याचा निर्णय ग्राम शिक्षण कमिटीमध्ये सर्व संमतीने घेण्यात आला.. या निर्णयाचे स्वागत अनेक *जिल्हा परिषद शाळांमध्ये* होत असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीस चालना आणि त्यांच्या आई-वडिलांना मानपान आणि झेंडावंदनासाठी ओढून तरुण मान घेणाऱ्यांसाठी चपराक... अशा निर्णयाचे स्वागत सर्वच सामाजिक संघटनानी केले असून ठाणे जिल्हा परिषद च्या सर्व साधारण सभेमध्ये *भादाणे झेंडावंदन* उपक्रम सर्व राज्यात लागू करावा अशा पद्धतीचा ठराव ठाणे जिल्हा परिषदने घेऊन मुख्यमंत्र्यांना दिला आहे
सौजन्य (वृत्त) - श्री एकनाथ घुडे
No comments:
Post a Comment