रुतिक हरिश्चंद्र मोरे यांची सैन्य दलात नियुक्ती झाल्याने तळा तालुक्यात जल्लोष तर चरई बुद्रुक गावात भव्य मिरवणूक !!
बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) : रायगड जिल्ह्याच्या तळा तालुक्यातील अडणाले गावचे सुपुत्र कु. रुतिक हरिश्चंद्र मोरे यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली त्यामुळे संपूर्ण तळा तालुक्यासह त्यांच्या अडणाले गावात आणि त्यांच्या आजोळी अर्थात चरई बुद्रुक गावाला आनंद झाला असून त्यांच्या आजोळी चरई बुद्रुक गावात मोठ्या उत्साहात लेझीम ढोल ताशा च्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
कु. रुतिक हरिचंद्र मोरे या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलाने कठोर परिश्रम करून आपले शिक्षण घेतले. त्या नंतर हैद्राबाद येथे सात महिन्यांचे सैनिकी प्रशिक्षण घेतले. आता त्यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली. त्यामुळे संपूर्ण तळा तालुक्यासह त्यांच्या अडणाले या त्याच्या गावी, तसेच चरई बुद्रुक या आजोळी जल्लोषात मिरवणूक काढून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.रुतिक हरिश्चंद्र मोरे हे चरई बुद्रुक गावचे एकनिष्ठ शिवसैनिक असून कै.गोविद ढऊळ यांचे नातु तसेच तळा तालुका विभागप्रमुख श्री.मनोहर काप यांचे भाचे आहेत. त्यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याने संपूर्ण तळा तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या स्वागत समरोह कार्यक्रमात अनेक मान्यवर, नातेवाईक, मित्र परिवार आणि ग्रामस्थ यांनी त्यांच्या भावी वाटचालीस त्यांना आशिर्वाद आणि हार्दिक शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment