Wednesday, 16 August 2023

स्वातंत्र्य दिन व स्व. बाळकृष्ण पूर्णेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त जिजाऊ संस्थेच्यावतीने सामाजिक उपक्रम !!

स्वातंत्र्य दिन व स्व. बाळकृष्ण पूर्णेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त जिजाऊ संस्थेच्यावतीने सामाजिक उपक्रम !!

*शहापूर तालुक्यात ७० महिलांना अल्प दरात घरघंटी वाटप*

शहापूर, प्रतिनिधी : स्वातंत्र्य दिन व स्व. बाळकृष्ण पूर्णेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त जिजाऊ संस्थेच्यावतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आले .शहापूर तालुक्यात ७० महिलांना अल्प दरात घरघंटी वाटप कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. परिसरातील महिलांनी या कार्यक्रमास उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्याचे पाह्यला मिळाले . 

मागील १५ वर्षापासून जिजाऊ संस्था कोकणात शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती, महिला सक्षमीकरण या विषयावर काम करत आहे त्याच माध्यमातून ग्रामीण भागातील महिला सक्षम ,सबळ होण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थापक निलेश सांबरे व जिजाऊ महिला सक्षमीकरण प्रमूख  मोनिका पानवे यांच्या माध्यमातून आसनगाव व कानवे येथील गरजू महिलांना अल्प दरात घरघटी वाटप करण्यात आल्या. यावेळी आसनगाव शहरातील ४० व कानवे विभागातील ३० महिलांना घरघटी देण्यात आल्या. घरघंटी वाटप कार्यक्रमासाठी जिजाऊ संघटना पदाधिकारी व बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी लाभार्थी महिलांनी जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे व  मोनिका पानवे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. ग्रामीण भागातील महिला सक्षम- सबळ व्हाव्यात हाच जिजाऊचा उद्देश असून शहापूर तालुक्यातील ५०० महिलांना घरघंटी वाटप करण्याचा आमचा मानस असल्याचे यावेळी  जिजाऊ महिला सक्षमीकरण व भिवंडी लोकसभा प्रमुख यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...