शिवस्फूर्ती प्रगती मंडळाच्यावतीने शैक्षणिक साहित्यांचे वाटप !!
घाटकोपर, (केतन भोज) : सामाजिक,शैक्षणिक,क्रिडा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या घाटकोपर पश्चिम येथील शिवस्फूर्ती प्रगती मंडळ यांच्या वतीने रामनगर नगर (अ ) येथे मंडळाच्या कार्यालयात अध्यक्ष हरेश आण्णा धांद्रुत यांच्या पुढाकाराने तसेच घाटकोपर इन्स्ट्रियल मधील उद्योजक प्रविण तोतरे व प्रकाश पाटील यांच्या सहकार्याने विभागातील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मान्यवर घाटकोपर इन्स्ट्रियल येथील उद्योजक प्रविण तोतरे व प्रकाश पाटील यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच उपस्थित सर्व विद्यार्थांनी ही आपल्यातील कला यावेळी सादर केली.यावेळी या कार्यक्रमाला शिवस्फूर्ती प्रगती मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी देखील उपस्थित होते.
No comments:
Post a Comment