Friday, 4 July 2025

शालिमार एक्सप्रेस नाशिक मेमो पारस येथे थांबा दयावा - आम्रपालीताई खंडारे (वंचित बहुजन आघाडी, जिल्हाध्यक्ष)

शालिमार एक्सप्रेस नाशिक मेमो पारस येथे थांबा दयावा - आम्रपालीताई खंडारे (वंचित बहुजन आघाडी, जिल्हाध्यक्ष) 

दि.२ जुलै २०२५ रोजी वंचित बहुजन आघाडी पारस यांच्या वतीने बडनेरा नाशिक मेमो अप (०१२११) व शालिमार लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस (१८०३०) या गाड्यांना पारस रेल्वे स्टेशन वर थांबा मिळावा यासाठी माननीय श्रीमती इति पांडे मॅडम, मंडल रेल प्रबंधक (डी.आर.एम.) भुसावळ मंडळ व स्टेशन प्रबंधक रेल्वे स्टेशन पारस मार्फत वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा माननीय सौ. आम्रपालीताई अविनाश खंडारे यांच्याकडून मागणी अर्ज देण्यात आला. ३०००० ची लोकसंख्या असलेल्या पारस गावामध्ये असंख्य विद्यार्थी शिक्षणाकरिता जिल्ह्याच्या ठिकाणी अकोला येथे ये जा करतात. तसेच गावात औष्णिक विद्युत केंद्र असल्याने कर्मचारी तसेच व्यापारी वर्ग दररोजचा प्रवास पारस येथे करतात.

मध्यंतरी काळात शालिमार लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस १८०३० या गाडीला पारस येथे थांबा होता, परंतु कोरोना काळात ह्या गाडीला पारस येथील थांबा बंद करण्यात आला होता त्यामुळे सर्वांना प्रवासाची असुविधा व त्रास होत आहे. 

करिता आज वंचित बहुजन आघाडीतर्फे माननीय श्रीमती इति पांडे मॅडम, मंडल रेल प्रबंधक (डी.आर.एम.) भुसावळ मंडळ यांना  मागणी अर्ज देण्यात आला त्यावेळी माननीय सौ. आम्रपालीताई अविनाश खंडारे, माजी जि.प. समाजकल्याण सभापती अकोला व महिला जिल्हाध्यक्षा वंचित बहुजन आघाडी, योगिता सुशील शेलार, उषाबाई शेलार, अंजना काशीनाथ सावदेकर,सुमनबाई भीमराव परसोडे, बेबीबाई अशोक इंगळे, कुंडाबाई रघुनाथ गायकवाड, विद्याबाई मधुकर ठोसरे, युनुस सेठ, इलियास बेग, खुर्शिद राणा, हमीद टेलर, शे.फारुख, सलमान माही, शे.नझीम, अश्विन खंडारे सर, रामा लांडे, गणेश लांडे, अजय राजनकर, प्रकाश शाहू, गजू गायकवाड, राहुल खंडारे, रोहित वानखडे, नितीन मोहोड, नरेश चावरिया, मुकेश लोढगे, विलास इंगळे गुरुजी, किशोर खंडारे, मनोज खंडारे, सागर नाटेकर, कैलास बगाडे, भूषण करांगळे, अमोल खंडारे, बिलाल ठेकेदार, शे. अहमद, प्रेम वानखडे, तेजस मोरे, राहुल हिवराळे, शुभम जिराफे, सोनवणे काका, राहुल शेलार, दादू सोनवणे, प्रशांत तायडे, प्रशिक सोनवणे, आकाश खंडारे, मुकेश खंडारे, नरेंद्र नवनीत इंगळे तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कोकणच्या कला संस्कृतीला वाव देण्यासाठी सुवर्ण-भास्कर नमन स्पर्धा २०२५ च्या बक्षीस वितरणचे २३ जुलैला मुंबई येथे आयोजन !!

कोकणच्या कला संस्कृतीला वाव देण्यासाठी सुवर्ण-भास्कर नमन स्पर्धा २०२५ च्या बक्षीस वितरणचे २३ जुलैला मुंबई येथे आयोजन !! ** शिवसेना नेते, वि....