उरण मधील तीन खेळाडूंची मुंबई डिविजन द्वारे राष्ट्रीय स्तरावर निवड !!
उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : ५० बोल्स क्रिकेट फेडेरेशन ऑफ इंडिया मार्फत भुवनेश्वर, ओडिसा येथे ११ जुलै २०२५ ते १५ जुलै २०२५ दरम्यान होत आहेत. ह्या नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्र स्टेट असोसिएशन तर्फे घेतल्या गेलेल्या निवड चाचणी मध्ये उरण तालुक्यातील सेवेन स्टार क्रिकेट अकॅडेमीच्या तीन्ही विद्यार्थ्यांची मुंबई डिविजन चा अंडर-१९ संघात निवड झाली आहे. खेळाडूंचा ह्या सर्वोत्कृष्ट निवड झाल्याची खुशीची खबर सामाजिक माध्यमांद्वारे प्रगट केली जात आहे.
कु. दूर्गेश रविंद्र कोळी (ऑल राऊंडर), कु. रितुराज रमेश सरोज (ऑल राऊंडर), कु. अभिजीत कुमार चंद (बॅट्समन) असे ह्या खेळाडुंचे नावे आहेत. राष्ट्रीय स्तरावर सहभागी होत असललेल्या मुंबई डिविजन संघा कडून त्यांना संघा मध्ये समाविष्ट केल्या बद्दल सेवेन स्टार क्रिकेट अकॅडेमी उरण चा खेळाडुंमध्ये, पालकांमध्ये हरशोल्लास चे वातावरण आहे. कोचेस प्रवीण संग्राम तोगरे, मयूर कदम व तनिष्क तोगरे यांच्याद्वारे ही खुशी व खेळाडूंच्या कामगिरी बद्दल गर्व व्यक्त होत आहे. “मुलांनी आवडीचे खेळ शिकले पाहिजेत, मनापासून ते खेळले पाहिजेत व विविध स्पर्धांमध्ये भाग घेतले पाहिजे. पालकांनी ही त्यांना पूर्ण स्वरूपाने साथ दिली पाहिजे, तेव्हा कुठे चांगले खेळाडू घडतात व देशाचे नाव लौकिक करतात. तिघे ही खेळाडू गेली एका वर्षा पासून ह्या केंद्रातून मार्गदर्शन घेत आहेत व तिघे ही आपल्या परिश्रमाने राष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या ह्या चॅम्पियनशिप मध्ये आपली छाप पाडतील” असे कोच प्रवीण संग्राम तोगरे यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment