कन्यादान योजना व विधवा पत्नी अनुदान योजना लाॅटरी पद्धतीने न काढता सर्व विधवा महिलांना सरसकट मदत करावी !!
** स्फूर्ती फाउंडेशन ची कल्याण डोंबिवली महानगरपालिका
महिला व बालकल्याण विभागाकडे मागणी
कल्याण, प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महानगरपालिका कन्यादान योजना व विधवा पत्नी अनुदान योजना मध्ये दरवर्षी हि मदत आपल्या विभाग माध्यमातून देण्यात येते यामध्ये मागील १ व २ वर्षांमध्ये मृत्यू झालेल्या पुरूषांच्या पत्नीला हि मदत देण्यात येते व ती त्या कालावधीत येत असलेल्या सर्व महिलांना देण्यात येत होती.
नुकतीच महिला बालविकास विभाग मार्फत जाहिरात मध्ये दोन्ही योजना मध्ये लाॅटरी पद्धतीने मदत करण्यात येणार असून ती लाॅटरी पद्धतीने काढणार असल्याचे पत्रामध्ये दिसते, महिलांचे नाव लाॅटरी मध्ये येणार नाही, त्यांच्या मदतीचे काय असा सवाल स्फूर्ती फाउंडेशन ने केला असून हि काही घराची सोडत आहे का ? असा प्रश्न पडतो, हि एक मदत असेल तर ती गरजू महिलांना नियमानुसार सर्वांना मिळाली पाहिजे असे लाॅटरी पद्धतीने मदत करने म्हणजे महिलांच्या दुःखावर मिठ चोळण्यासारखे असून ज्याचा घराचा आधार गेला अशा महिलांचा अपमान असून लाॅटरी पद्धत बंद करून सरसकट मदत करावी तसेच यापूर्वी ५ वर्षात ज्या महिलांनी लाभ घेतला नाही अशा सर्व महिलांना मदत मिळावी अशी मागणी स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर, महिला प्रमुख शिल्पा तांगडकर, जेष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर यांच्या वतीने करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment