Friday, 11 July 2025

अवलिया सर्पमित्रा मुळे अंड्यातील सापाच्या पिल्लांना मिळालं जीवदान !

अवलिया सर्पमित्रा मुळे अंड्यातील सापाच्या पिल्लांना मिळालं जीवदान !

उरण दि ११, (विठ्ठल ममताबादे : निसर्गाने आपल्याला भरभरून दिलं आहे त्याच्या कुशीत सामावलेल्या सर्व साधन- संपत्तीचं जतन करणं त्याच सोबत त्यात वावरणार्‍या प्राणी - पक्षी आणि वन्यजीवांच संरक्षण, संवर्धन करणं हे प्रत्येक मानवाचं आद्य कर्तव्य आहे आणि ह्याच कर्तव्याप्रति प्रामाणिक राहण्याच्या जबाबदारीची जाणीव करून देणारी काही व्यक्तिमत्त्व काही सामाजिक संस्था या समाजात अगदी प्रामाणिकपणे आपलं काम करत असतात त्यातलच  एक नाव म्हणजेच केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य. त्या संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर आणि पदाधिकारी, सदस्य आज पण प्राणी-पक्षी आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी जीव ओतून काम करत असतात आणि त्यातच जिवंत उदाहरण म्हणजे केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे उलवे नोड अध्यक्ष विकी देवेंद्र यांना उलवे शिवाजीनगर येथील सिडको उद्यानामध्ये असणार्‍या दगडांच्या आत मध्ये सापांची अंडी निदर्शनास आली. ह्या अवलिया वन्यजीवप्रेमी सर्पमित्राने ती सापाची मिळालेली एकूण ३० (तीस अंडी) त्या दगडां मधून  सुखरूप बाहेर काढून एका वाळूने भरलेल्या बंद डब्यामध्ये तब्बल २१ (एकवीस  दिवस) ठेवली त्या नंतर त्या अंड्या मधून एकूण २८ (अठ्ठावीस) सापाची पिल्ले जन्माला आली. याची सर्व माहिती महाराष्ट्र वन विभागाचे उरण वनविभाग वनपरीक्षेत्र अधिकारी एन जी कोकरे यांना कळविण्यात आली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या सर्व सापाच्या पिल्लांना निसर्गाच्या अधिवासात मुक्त संचार करण्यासाठी जंगलामध्ये सोडण्यात आले. वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाच्या कार्यात आपलं अमूल्य योगदान देणार्‍या  विकी देवेंद्र ह्या अवलिया सर्पमित्रावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होतांना दिसत आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...