Monday, 18 August 2025

पत्रकार बाळासाहेब भालेराव यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित! !

पत्रकार बाळासाहेब भालेराव यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित! !

मुरबाड  ( मंगल डोंगरे )  : मुरबाड मध्ये  स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हा संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने मुरबाडमध्ये भारतीय सैनिकांच्या आईवडिलांचा सत्कार सोहळा सोळा संपन्न झाला. 

तसेच गुणवंत सत्कारामध्ये मुरबाड तालुक्यातील कोरावळे गावचे सुपुत्र तथा महाराष्ट्र शासन अधिस्वीकृती पत्रकार बाळासाहेब भालेराव यांना ट्रॉफी व सन्मानपत्र तसेच फुलगुच्छ देऊन आदर्श पत्रकार पत्रकार पुरस्काराने दानशूर व्यक्तिमत्व नांजी खिमजीभाई ठक्कर (ठाणावाला), प्रसिद्ध गायक जगदीश पाटील, पत्रकार सुदाम पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन ठाणे जिल्हा अध्यक्ष योगेश हजारे व मुरबाड तालुका अध्यक्ष नरेश म्हाडसे त्यांच्या नियोजनात
गुणवंत व्यक्तींचा सन्मान सोहळा दानशूर व्यक्तिमत्व नानजी खिमजीभाई ठक्कर (ठाणावाला) यांच्या प्रमुख  उपस्थितीत संपन्न झाला 

यापुढे सोहळ्यामध्ये खालील पुरस्कार वितरित करण्यात आले
नम्रता नितीन तेलवणे (आदर्श नगरसेविका), मधुकर (आप्पा) घुडे (समाजभूषण), समिती सुरोशी (आदर्श सरपंच), वसंत लोणे (कुणबी समाजभूषण), रमेश दळवी (आदर्श सरपंच), जगदीश पाटील (आदर्श गायक), राजेश विशे (आदर्श जिल्हापरिषद सदस्य), अपर्णा खाडे (आदर्श समाजसेविका), करुणा गगे (आदर्श उत्कृष्ट निवेदिका), मनोज देसले, (मुरबाड युवा भूषण), प्राची पाटील (आदर्श मुरबाड कन्या  रत्न), अशोक शिंगोळे (आदर्श गायक) यांच्यासह आदर्श हरिपाठ, आदर्श कबड्डीचा संघ यांच्या सह ३० पुरस्कार वितरित करण्यात आले

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...