Tuesday, 19 August 2025

शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनातर्फे आयोजित चॅनेल बंद आंदोलन तात्पुरते स्थगित.!!

शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनातर्फे आयोजित चॅनेल बंद आंदोलन तात्पुरते स्थगित.!!

उरण दि १९, (विठ्ठल ममताबादे) :
विविध सकारात्मक बैठका व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन यामुळे शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनातर्फे आयोजित चॅनेल बंद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. हे आंदोलन १५ ऑगस्ट पासून सुरु होणार होते मात्र त्यापूर्वी बैठका संपन्न होऊन सदर समस्या मार्गी लावण्याचे प्रशासनातर्फे आश्वासन मिळाल्याने सदर समुद्र चॅनेल बंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे.जुना शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) ग्रामस्थांचे पुनर्वसन न झाल्याने तसेच इतर महत्वाच्या मागण्याच्या अनुषंगाने हे चॅनेल बंद आंदोलन करण्यात येणार होते. मात्र प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे तूर्तास हे आंदोलन तात्पुरते स्थगित झाले आहे. 

जिल्हाधिकारी रायगड यांनी त्यांचे अध्यक्षते खाली दि. ०६/०८/२०२५ रोजी पुनवर्सन संबंधित विभागाची बैठक घेतली त्या बैठकीत विस्थापितांचे अजेंडा मधील १ ते २१ मुद्यावर ठोस निर्णय घेतले होते. त्याच वेळी सर्वांना दि. ०९/०८/२०२५ रोजी रक्षा बंधनाचे दिवशी नवीन गावठानात भूखंड वाटप करण्याचे निमंत्रण दिले होते. दि. ०९/०८/२०२५ रोजी NSPT प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा गावातील शेतकरी/बिगर शेतकरी २५६ कुटुंबांचे दि. १२/११/१९८२ ते १२/०३/१९८७ सालात पायरी पायरीने शासनाचे माप दंडाणे मंजूर असलेले पहिलेच पुनर्वसन JNPA ने JNPT चे कामगार वसाहती लागून दिलेल्या मौजे जसखार व फुंडे गाव नकाशातील विकसित जमिनीत भूखंडांचा ताबा घेणेस विधिवत पूजा केली. आणि नवीन जमीन साफ सफाई करनेस सुरुवात केली आहे. आणि मंजूर नकाशा नुसार भूखंड वाटप चालू केले आहे. दि.१२/०८/२०२५ रोजी पोलीस प्रशासनाने मा. लक्ष्मणन साहेव जाइंट सेक्रेटरी केंद्रीय बंदर विभाग यांच्या अध्यक्षते खाली  उन्मेष शरद वाघ, श्रीमती मनीषा जाधव , किशोर गायके, बापू ओवे, सूर्यकांत कांबळे  आणि विस्थापित यांच्या सोबत लक्ष्मणन साहेब जाइंट सेक्रेटरी केंद्रीय बंदर विभाग यांनी लवकरात लवकर केबिनेट मंजूरी घेवून जमीन देण्याचा ठोस निर्णय घेतला आहे. मंजूर नकाशा नुसार भूखंड बाटप चालू केले आहे त्याला संमती दिली आहे.  विनोद बोंदरे , उप सचिव ग्राम विकास विभाग यांनी दि ०१/०८/२०२५ रोजी हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत कलम १४५ नुसार बरखास्त करणेबाबत मा. उप आयुक्त निवडणूक आयोग यांना सांगितलेले आहे. दि. १४/०८/२०२५ रोजी अमित काळे उप आयुक्त पोलीस झोन २, बेलापुर यांच्या अध्यक्षते खाली संबंधित पोलीस अधिकारी आणि विस्थापित यांची बैठक झाली त्या बैठकीत नवीन गावठाणात नागरी सुविधेची कामे चालू करणे. दि.१३/०८/२०२४ रोजी मा. जिल्हाधिकारी रायगडने संक्रमण शिबिर सांभाळ करण्याची जबाबदारी JNPA व्यवस्थापणाकडे सोपविलेली होती. त्याची हमी JNPA व्यवस्थापणाने दि. ३०/०९/२०२४ रोजीच्या पत्राने दिलेली आहे. त्याचे अनुपालन करणे, पुराव्या साठी प्रत जोडली आहे. विस्थापिताची नोकर भरती करणे, सामाजिक गुन्हे मागे घेणे, शेवा बेटावरील १३०० हेक्टर सीमेतील ६० बंधकामांचा JNPA व्यवस्थापणाने थकविलेला मालमता कर देणे, हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत बंद करणे वगैरे वगैरे अनेक मुद्यावर आश्वासन दिले आहे.अमित काळे  उप आयुक्त पोलीस झोन २, बेलापुर यांच्या विनंतीला मान देवून विस्थापितानी JNPA चॅनेल दि.१५ ऑगस्ट २०२५ पासून होणारे बेमुदत बंद आंदोलन पुढे ढकलले आहे.


कोट (चौकट ):- 

ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा शासनाने दि.१/८/२०२५ रोजी बरखास्त केली आहे. मा.उप सचिव, ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य  यांनी दि.०१/०८/२०२५रोजी हनुमान कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनाचे काम अद्याप सुरू असून पुनर्वसन पूर्ण झाल्याचे दिसून येत नाही. सदर गावातील रहिवाशाकरिता गावठाण घोषित नाही. तसेच नमूना ८ वरील नोंदीत मालमत्ता धारकांकडे घर /इमारतीचे शासकीय अभिलेख (सनद तथा ७/१२) उपलब्ध नाहीत. म्हणून हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत कलम १४५ नुसार बरखास्त करणेबाबत मा.उपायुक्त,निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांना सांगितलेले आहे. तसे पत्रव्यवहार सुद्धा झालेले आहेत. म्हणून सदर समुद्र चॅनेल बंद आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे.
   - रमेश कोळी, सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामस्थ हनुमान कोळीवाडा.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...