अमली पदार्थांविरोधात वाडा पोलिसांची जनजागृती मोहीम !!
वाडा (प्रतिनिधी) : वाडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा. श्री. दत्तात्रेय किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रियल अकॅडमी येथे “अमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती” मोहीम राबविण्यात आली.
या कार्यक्रमात दत्तात्रेय किंद्रे यांनी अमली पदार्थांचे वैयक्तिक आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम, कुटुंब व समाजावर होणारे परिणाम, तसेच अमली पदार्थांच्या आहारी जाण्यामुळे होणारे मानसिक, आर्थिक आणि सामाजिक नुकसान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. युवकांनी अमली पदार्थांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा व सकारात्मक छंदांकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.
अमली पदार्थांविरुद्ध पोलीस प्रशासनाच्या विविध मोहिमा, कायदेशीर तरतुदी आणि त्यांची अंमलबजावणी याविषयीही माहिती देण्यात आली. उपस्थित विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांना ‘नाही’ म्हणण्याचा संकल्प केला.
या उपक्रमाला रियल अकॅडमीचे संचालक शशांक ठाकरे, विशाल ठाकरे, शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा जनजागृती कार्यक्रम अमली पदार्थांविरोधातील लढ्यात प्रभावी पाऊल ठरेल असा विश्वास संचालकांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment