'सिद्धार्थ महाविद्यालया'त ७९वा "स्वातंत्र्य दिवस" उत्साहात साजरा !!
संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५३ साली स्थापन केलेल्या आमच्या सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयात काल ७९वा स्वातंत्र्य दिवस एका वेगळ्या पद्धतीने संपन्न झाला. यामध्ये ३०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा, विशेषत: एनएसएस व एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता. काही माजी विद्यार्थी देखील आवर्जुन उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठिक. ८.३० वाजता एनसीसी कॅडेटच्या वाद्यवृंद पथकाच्या सादरीकरणाने झाली. त्यांनी बॅंडच्या तालावर उत्तम कवायत सादर करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्यानंतर त्यांनी प्राचार्य डॉ. यु. एम. मस्के सरांना *'गार्ड आॉफ ऑनर'* (मानवंदना) दिल्यानंतर त्यांच्या हस्ते सर्व उपस्थितांसमोर ध्वजारोहण करण्यात आले व सर्वांनी झेंडावंदन करून सामुदायिक राष्ट्रगिताने सलामी दिली. हा सर्व अर्ध्या तासाचा सुंदर कार्यक्रम डॉ. शशिकांत मुंडे (ए.एन.ओ.) यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला.
त्यानंतर महाविद्यालयाच्या सभागृहात सांस्कृतिक समितीने विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीवर आधारित काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. ज्यामध्ये १३ विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वरचित कविता सादर केल्या. त्यानंतर एन एस एसच्या विद्यार्थ्यांचे व्यसनमुक्ती व स्वच्छ भारत अभिनयावर आधारित प्रत्येकी १५ मिनिटांच्या दोन पथनाट्यांचे उपस्थित विद्यार्थ्यांसमोर सुंदर सादरीकरण झाले. तसेच कु. गौरव माने या विद्यार्थ्याने इंग्रजीत एकपात्री अभिनयाद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कु. काजल कोळी या विद्यार्थिनीने नृत्याच्या माध्यमातून देशप्रेम व्यक्त केले. तसेच डॉ. समीर ठाकूर, प्रा. विशाल करंजवकर यांनी देशभक्तीपर प्रत्येकी १ गाणे गाऊन सर्वांचे मनोरंजन केले. प्रा. कौसर यांनी कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उत्तम कविता सादर केलेल्या ४ विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. मस्के सरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित केले व त्यांनी त्यांच्या भाषणातून थोर गीतकार व कवी संतोष आनंद यांच्या देशभक्तिपर गाण्याचा संदर्भ देऊन आपले मनोगत व्यक्त केले. सर्व विद्यार्थी व सहभागी शिक्षकांचे कौतूक केले. ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. संजयकुमार बोरसे सरांनी देखील स्वातंत्रदिनाचे महत्व त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वितेसाठी सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष डॉ. सुनिल गायकवाड यांच्या नेतृत्वात प्रा. राधा, प्रा. मारिया, प्रा. पगारे, प्रा. कुंदन, प्रा. अलीना, कु. मानव व कु. सुजल या विद्यार्थ्यांसह प्रा. विशाल इत्यादींनी मागील दोन तीन आठवड्यापासून भरपूर मेहनत घेतली.
*-डॉ. विष्णू ज. भंडारे*
*(मुंबई प्रतिनिधी)*
No comments:
Post a Comment