Monday, 4 August 2025

मुरबाड येथील मे.ओरिएंटल कंन्टेनर्स लि. मुरबाडच्या कामगारांना नऊ हजार सहाशे पन्नास रुपयांची वेतनवाढ !!

मुरबाड येथील मे.ओरिएंटल कंन्टेनर्स लि. मुरबाडच्या कामगारांना नऊ हजार सहाशे पन्नास रुपयांची वेतनवाढ !!

** कामगारांमध्ये जल्लोष 

मुरबाड :{ मंगल डोंगरे } : मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील  मे. ओरिएंटल कन्टेंनर्स लि. या कंपनीत वेतन वाढीसाठी कंपनी व्यवस्थापन आणि कामगार युनियन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वेतन वाढीसंदर्भात चर्चा सुरू होती.मात्र आज अखेर त्या चर्चेला यश आले असून, युनियनच्या माध्यमातून  कंपनीतील कामगारांना ९६५० रुपयांची  भरघोस अशी वेतनवाढ मिळाली आहे. सिटू सल्गन महाराष्ट्र इंजिनियरींग ऊद्योग कामगार संघटना व  ओरिएंटल व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

यावेळी कामगारांना तीन वर्षासाठी रुपये ९ हजार  सहाशे पन्नास रुपये वेतनवाढ करार करण्यात आला. पहिल्या वर्षी ६o टक्के, दुसऱ्या वर्षी २० टक्के व तिसऱ्या वर्षी २० टक्के याप्रमाणे ही वाढ मिळणार आहे. तसेच कामगार आणि त्यांच्या परिवारासाठी २ लाखाची मेडिकल पॉलिसी काढण्यात येणार आहे. याचबरोबर बोनस, प्रवास भत्ता, रजांसहीत या करारापोटी कामगारांना २ महिन्यांचा एरियस देखील मिळणार आहे. सिटु सभासद सर्व कामगारांना या कराराचा लाभ मिळणार आहे. वेतनवाढीचा करारावर सिटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, सेक्रेटरी -राज्य कमिटी सदस्य विजय विशे, तालुका अध्यक्ष  दिलीप कराळे,सरचिटणीस अशोक विशे, युनियन कमिटी मेबंर शिवाजी तुपे, सुरेश कडव, संतोष शिर्के,  परेश घुडे, शिवाजी महाजन, मधुकर टोहके, नरेश पष्टे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. याप्रसंगी कंपनीचे एच.आर. संजय बामणे साहेब, युनियनचे उपाध्यक्ष सिताराम ठोंबरे, देवीदास आडोळे, खजिनदार संतोष काकडे, मुरबाड तालुका जनरल सेक्रेटरी सागर भावार्थे हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...