देहरी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण दादा धुमाळ यांची बिनविरोध निवड !!
मुरबाड ( मंगल डोंगरे ) : नुकताच झालेल्या देहरी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदाच्या निवडणुकीत खोपिवली गावचे माजी उपसरपंच लक्ष्मण दादा यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे.
सन 2022 साली झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी खातेदार व सभासदां मधुन एकुण 13 संचालकांची सर्वानुमते निवड करण्यात आली होती. त्यावेळी चेअरमनपदी श्री.सुरेश हुमणे यांची निवड केली होती. मात्र त्यावेळी आपसात ठरलेल्या कालावधी संपल्यानंतर सुरेश हुमणे सर यांनी चेअरमनपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या चेअरमन पदाची काल निवडणूक लागली असता, चेअरमन पदासाठी लक्ष्मण दादा धुमाळ यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी धुमाळ यांच्या नावाची घोषणा जाहीर केली.
धुमाळ हे खोपिवली पंचक्रोशीत सुपरिचित असुन, वेळप्रसंगी गोरगरीबांना मदत करणारे दानशूर दाते असुन, त्यांच्या निवडीने शेतकरी, सोसायटीच्या सभासद, संचालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
No comments:
Post a Comment