गुणवत्ता वाढीस चालला देणारा ध्वजारोहणाचा भादाणे पॅटर्न !!
....*राज्यात प्रथमच ठाणे जिल्ह्यातील "भादाणे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे"त 15 ऑगस्ट 2015 रोजी मा, सरपंच व त्याच शाळेचे शिक्षण कमिटीचे अध्यक्ष श्री संजय हांडोरे पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी निर्णय घेऊन अनुक्रमे स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहणाचा मान इयत्ता दहावी व बारावीला प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या निवासी किंवा अनिवासी विद्यार्थांच्या हस्ते व त्यांच्या आई वडिलांच्या सोबत देण्यात आला*....
या निर्णयाचे स्वागत संपूर्ण राज्यभर होत असून अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे की हा पॅटर्न संपूर्ण राज्यात लागू करावा.
डिसेंबर २०२३ रोजी ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने या भादाणे पॅटर्न चे खूप कौतुक झाले असून हा पॅटर्न राज्यात लागू करावा म्हणून जिल्हा परिषद ने तक्तालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांना सर्वसंमतीने ठराव पाठविला आहे.
या अनोख्या निर्णयामुळे विद्यार्थांच्या गुणवत्ता विकासाला चालना मिळाली ..गावातील ध्वजारोहण करण्यावरून होणारी राजकीय भांडणे थांबली आहेत....एक निकोप आदर्श शैक्षणिक स्पर्धा वाढीस लागली आहे....
हा निर्णय शाळेच्या शिक्षण कमिटी व ग्रामसभेत सर्वमातने घेण्यात आला आहे....हा निर्णय लागू करताना तत्कालीन मुख्याध्यक राजाराम कंटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते..... या वर्षी (15ऑगस्ट 2025) भादाणे गावाचा २० वा विद्यार्थी या ध्वजारोहणाचा मान घेत आहे*.....
देशभरात या भादाणे ध्वजारोहण या अनोख्या उपक्रमाचे स्वागत होत असून उत्तर प्रदेश सरकारचे शिक्षण मंत्री यांनी मा.श्री आशिषजी पटेल यांनी ४ फेब्रुवारी २०२४ रोजी श्री संजय हांडोरे पाटील यांना लखनौ येथे आमंत्रित करून या अनोख्या ध्वजारोहण उपक्रमांचे कौतुक करून त्यांचा यथोचित सत्कार केला होता*....
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
सन्माननीय व्यक्तिमत्त्व __
*मा.सरपंच तथा शिक्षण कमिटी अध्यक्ष,श्री संजय हांडोरे पाटील* - 7745048505
*श्री राजाराम कंटे सर* - 8779948384
प्रसिद्धीसाठी / लेख
*श्री दिनेश जाधव*
*स्टार सोशल मीडिया प्रमुख भिवंडी*
No comments:
Post a Comment