महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून जेष्ठ कलावंत साहित्यिक वारकरी दरमहा ५ हजार रूपये मानधन !!
**भारत सरकार मान्यता प्राप्त ; अखिल भारतीय कलावंत न्याय समितीचा पुढाकार
मुरबाड, ( मंगल डोंगरे ) :
भारत सरकार मान्यता प्राप्त अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सरसेनापती आदरणीय सोमनाथ दादा गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणे जिल्हा अध्यक्ष, गितकार श्री बाळासाहेब शिंगोळे यांच्या नेतृत्वाखाली, समाज प्रबोधनासाठी आपले आयुष्य वाहून घेतलेले साहित्यिक वारकरी भजनी गायक, मृदुंग वादक, किर्तनकार, प्रवचनकार, हरिपाठ, चित्रकार, वाघ्या मुरळी, संभळ, ब्रास बॅंड, बॅंजोपार्टी, नाटक, भारूड, आदिवासी, नृत्य, कवि, सुत्रसंचलन, शिवव्याख्याते व विविध क्षेत्रातील जेष्ठ कलावंत आजही आपल्या कलेच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम करत आहेत, परंतु ठाणे जिल्ह्यातील कलावंत अनेक वर्षांपासून या शासकीय योजने पासून वंचित होते, मात्र सुप्रसिद्ध भजन साम्राज्ञी युट्यूबर महाराष्ट्र राज्य भूषण पुरस्कार प्राप्त गायिका कु तनुजा बाळासाहेब शिंगोळे यांची फेमस गवळण अंग राधे तु हळूहळू चालना या गवळणीने संपूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला आणि ख-या अर्थाने ठाणे जिल्ह्यातील कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी, या संघटनेची घोडदौड सुरू झाली ति एक मेव पोलादी संघटना म्हणजेच अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती, या संघटनेच्या माध्यमातून कलावंतांसाठी शासकीय योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे सर्व क्षेत्रातील कलावंतांपर्यंत जनजागृती केली आणि त्याच माध्यमातून, राजश्री शाहू महाराज साहित्यिक वारकरी कलावंत योजनेचे प्रचार सुरू झाला.
आजवर शहापूर, भिवंडी, कल्याण व मुरबाड तालुक्यातील जेष्ठ कलावंताना त्यासाठी लागणारे कागदपत्रे कलावंतानी गोळा करण्यास सुरुवात केली, तसेच मुरबाड विधानसभा आमदार मा श्री किशनजी कथोरे साहेब, भिवंडी विधानसभा आमदार मा श्री शांतारामजी मोरे साहेब, शहापूर विधानसभा आमदार मा श्री दैवलत दरोडा साहेब, या तिन्ही कार्यसम्राट आमदार साहेबांनी वेळोवेळी कलावंतांच्या मागणी नुसार शिफारस पत्र देण्यासाठी खूप मोठे सहकार्य मिळाले त्यामुळेच आज पर्यंत जवळपास १५० ते २०० अर्ज आँनलाईन करता आले, त्याचबरोबर संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन या शासकीय योजने संदर्भात माहिती दिली त्यामुळेच हे सर्व समाजकार्य करण्यास आम्हाला उर्जा निर्माण झाली, राजश्री शाहू महाराज साहित्यिक वारकरी कलावंत योजनेचे आँनलाईन अर्ज येशयस्वी दाखल करण्यासाठी, गितकार श्री बाळासाहेब शिंगोळे ठाणे जिल्हा अध्यक्ष, श्री संतोष घरत साहेब ठाणे जिल्हा उपाध्यक्ष, श्री विष्णू पडवळ साहेब ठाणे जिल्हा सचिव, श्री सुरेश बुवा घरत ठाणे जिल्हा संघटक, निवेदक श्री संजय जाधव साहेब ठाणे जिल्हा संपर्क अध्यक्ष, श्री वसन महाराज वरकुटे ठाणे जिल्हा सल्लागार, कवि श्री मिलिंद आहिर सर ठाणे जिल्हा सल्लागार, गायनाचार्य हभप श्री रविंद्र महाराज राऊत भिवंडी तालुका अध्यक्ष, श्री नरेश बुवा निमसे शहापूर तालुका अध्यक्ष, श्री लक्ष्मण शेलार कल्याण तालुका अध्यक्ष, श्री सागर भावार्थे मुरबाड तालुका अध्यक्ष, हभप श्री विठ्ठल बुवा वरकुटे शहापूर तालुका कार्याध्यक्ष, श्री नामदेव महाराज खडके शहापूर तालुका संपर्क अध्यक्ष, श्री मंगलदास महाराज डोंगरे, जेष्ठ सल्लागार मुरबाड तालुका, श्री शिवनाथ भोईर साहेब कल्याण तालुका कार्याध्यक्ष, हभप श्री कपिल महाराज पाटील भिवंडी तालुका उपाध्यक्ष, श्री मनोहर दळवी कल्याण तालुका सचिव श्री बाळाराम पोंढेकर कल्याण तालुका उपाध्यक्ष, श्री संतोष टेंभे कल्याण तालुका सहसचिव, हभप श्री अविनाश गायकर शहापूर तालुका सल्लागार, श्री सुरेश वाळिंबे साहेब शहापूर तालुका सहसचिव, श्री सचिन पोतदार साहेब मुरबाड तालुका सचिव, हभप श्री प्रकाश महाजन फर्डे विभाग अध्यक्ष भिवंडी, हभप श्री वसंत महाराज सोनावले अल्याणी विभाग अध्यक्ष, कु गणेश धानके सो विभाग अध्यक्ष, श्री कैलास खंडागळे अस्नोली विभाग अध्यक्ष, श्री कृष्णा शिर्के मळेगाव विभाग संपर्क अध्यक्ष, श्री गणेश शिर्के शेणवा विभाग संपर्क अध्यक्ष, श्री दत्तात्रय चौधरी खडवली विभाग अध्यक्ष, व अन्य जेष्ठ श्रेष्ठ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जेष्ठ कलावंत साहित्यिक वारकरी यांच्याशी संपर्क साधून जनजागृती करण्यात आली.
No comments:
Post a Comment