🌹 *संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प), मुंबई येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा* !!! 🌹
कुर्ला प्रतिनिधी: ता. ६, पद्मश्री अण्णासाहेब जाधव समाज उन्नती मंडळ संचालित, संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) येथे दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्ताने शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी ९ सप्टेंबर हा संस्थापक शिक्षण महर्षी पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांचा जन्मदिन असल्याने तोही आजच्या कार्यक्रमात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास रात्रशाळेचे शिक्षक श्री. खैरनार सर, श्री. विरकर सर, श्री. शिकलकर सर उपस्थित होते. अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री. विश्वनाथ राऊत यांनी भूषविले. सूत्रसंचालन व प्रस्ताविक श्री. खैरनार सर यांनी केले. या वेळी श्री. शिकलकर सर यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व उलगडून सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या दिवसाची विशेष आकर्षण ठरले ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भूमिका साकारून शाळा चालवणे. यामध्ये मुथूवेल कोणार यांनी मुख्याध्यापक पद भूषविले तर सना शेख, ओमकार, सतीश, रितेश यांनी शिक्षकाची भूमिका पार पाडून आठवी, नववी व दहावीच्या वर्गात अध्यापन केले. विद्यार्थ्यांनी अनुभव व्यक्त करताना शिक्षक होणे किती जबाबदारीचे व आव्हानात्मक असते हे जाणवल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री. राऊत यांनी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व संस्थापक पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांच्या कार्याची माहिती दिली व शाळा यशस्वीरित्या चालविल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच ९ सप्टेंबरपर्यंत निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शेवटी श्री. खैरनार सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment