कल्याण, प्रतिनिधी :
कल्याण तालुक्यातील म्हसकळ ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम, गावातील जन्माला आल्यानंतर मुलींचे कुपोषण होवू नये तसेच आईची प्रकृती उत्तम रहावी यासाठी एक कौतुकास्पद निर्णय घेत आईला मानधन देण्याचा ठराव मंजूर केला आहे.
म्हसकळ ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच अनंता रघुनाथ दोर्लेकर यांनी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत हा ठराव प्रस्तुत केला असता सदर ठरावास सदस्य किशोरी गुरुनाथ भोईर यांनी अनुमोदन दिले या ठरावाला ग्रामपंचायत सरपंच ज्योत्स्ना महेंद्र मुकणे तसेच ग्रामपंचायत सदस्य सुरज सिताराम ताम्हाणे, अंजना गुरुनाथ धुमाळ, गणेश मोतीराम बगळे व ग्रामसेविका मिनल मनोहर भोईर यांनी मंजुरी दिल्याने ग्रामपंचायत हद्दीतील महिला वर्गात उत्साहाची लाट पसरली आहे. तसेच ग्रामपंचायती कडून गावातील जास्तीत जास्त महिलांनी याच लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच ग्रामपंचायतीतील स्मशानात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसून गावातील नळपाणी योजनेच्या विहीर कडे जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयास कळवणे व अनुसूचित जाती जमाती तील महिलेला प्रथम कन्या झाल्यास अनुदान मिळणे हे ठराव विद्यमान उपसरपंच अनंता रघुनाथ दोर्लेकर यांनी प्रस्तुत केले असता सदस्य किशोरी गुरुनाथ भोईर यांनी अनुमोदन दिले व सर्व संमतीने ठराव मंजूर करण्यात आले.
No comments:
Post a Comment