Wednesday, 10 September 2025

मुरबाड एस.टी.आगाराचे भोंगळ कारभारामुळे संतप्त प्रवाशांचा आगार प्रमुखांना घेराव.!!

मुरबाड एस.टी.आगाराचे भोंगळ कारभारामुळे संतप्त प्रवाशांचा आगार प्रमुखांना घेराव.!!

मुरबाड {मंगल डोंगरे} :- मुरबाड आगाराचे रामभरोसे कारभारामुळे प्रवाशी तासनतास बसची वाट बघत ताटकळत बसतात, परंतु आगार प्रमुख कोणत्याही प्रकारची उपाययोजना करत नसल्याने संतप्त प्रवाशांनी थेट आगार प्रमुखांचे दालनात प्रवेश करत आपला संताप व्यक्त केला. असता आगाराच्या कारभार चव्हाट्यावर आला आहे.

          मुरबाड तालुक्यातील शहरी औद्योगिक व ग्रामीण भागातील प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सुविधा देण्यासाठी आगारात असलेल्या बसेस ह्या कालबाह्य झाल्याने दररोज प्रत्येक मार्गावर दोन तीन बस बंद पडतात तर काही बसेस आता पेट घेत आहेत.प्रवांशाचे जीवीताचा धोका पाहून आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड आधारासाठी सुमारे दहा बसेस उपलब्ध करून दिल्या परंतु आगार प्रमुखांनी या बस मुरबाड करांना उपलब्ध करून न देता त्या नगर आळेफाटा, बिड तसेच अन्य लांब पल्ल्याच्या ठिकाणी या बस सुरू केल्या असल्याने मुरबाड करांना या बसमध्ये प्रवासाची संधी मिळणार कधी हा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. मंगळवारी मुरबाड म्हाडस नारिवली हि बस भुवन जवळ जात असताना अचानक पेट घेतला असता वाहक चालक दोघांनी प्तरवाशांचा विचार न करता तेथुन पलायन केले आणि सोमवारी ही तसाच प्रकार घडला नढई जवळ बस गेली आणि अचानक बंद पडली तेव्हाही वाहक चालक दोघेही निघुन गेले. प्रवाशांना वाटले की दुसरी बस आणायला गेले. परंतु ते परत आले नाही आणि गाडीही आली नाही. असे असताना बुधवारी तीन वाजता सुटणारी बदलापूर बस सहा वाजेपर्यंत सुटत नसल्याने संतप्त प्रवाशांनी थेट आगारात प्रवेश करत आगार प्रमुखांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता तेथे कार्यशाळा प्रमुखांनी संतप्त प्रवाशांचा उद्रेक पाहून बस सोडण्याची तयारी दाखवली असता वातावरण शांत झाले.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...