पद्मश्री दादा इदाते यांचा जागतिक शिखर परिषदेमध्ये सत्कार !!
पद्मश्री दादा इदाते यांनी भटक्या व विमुक्त समाजाच्या कल्याणासाठी व त्यांच्या शिक्षणासाठी केलेल्या मौल्यवान योगदानासाठी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय स्तरावरील ' सामाजिक समरसता ' या कार्यक्रमात दिलेल्या योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे.
त्यांच्या या विशेष सामाजिक व राष्ट्रीय कार्यातील समर्पणासाठी ब्रह्माकुमारीज मुख्यालय माऊंट आबू राजस्थान येथे सुरु असलेल्या जागतिक शिखर परिषदेमध्ये ब्रह्माकुमारीजच्या संयुक्त मुख्य प्रशासिका राजयोगिनी संतोष दीदीजी व संस्थेचे कार्यकारी सचिव राजयोगी मृत्युंजय भाई यांच्या हस्ते पद्मश्री दादा इदातेंचा पुष्पगुच्छ, शाल, ईश्वरीय भेट व मानाचा फेटा देऊन ब्रह्माकुमारीज मुख्यालयातील डायमंड हॉल येथे विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून भावी सामाजिक कार्यास व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी खेड सेवाकेंद्र संचालिका बी के गीता दीदी, सौ. संपदा पारकर आणि बी के भारत भूषण भाई व इतर अनेक गणमान्य उपस्थित होते. हा सन्मान परिषदेमध्ये उपस्थित असलेल्या देश विदेशातील सुमारे ८००० प्रतिनिधींच्या समक्ष प्रदान करण्यात आला.
वृत्तांत - विलासराव कोळेकर सर
No comments:
Post a Comment