Thursday, 16 October 2025

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कमाला लागा - खासदार श्रीकांत शिंदे

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कमाला लागा - खासदार श्रीकांत शिंदे 

मुरबाड, {श्री. मंगल डोंगरे} : राज्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती, महापालिका निवडणूका जिंकण्यासाठी महा युतीच्या कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा, असे आवाहन खासदार श्रीकांत शिंदे यांनी काल मुरबाड येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना व्यक्त केले आहेत.                    

महायुतीच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध शासकीय योजना जणसामान्य माणसासाठी तसेच लाडकी बहीण योजना ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. असे प्रतिपादन खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी मुरबाड येथील कुणबी समाज हॉल येथे आयोजित केलेल्या शिवसेना संवाद मेळाव्यात केले.
 व्यासपीठावर शिवसेना नेते प्रकाश पाटील, उपनेते निलेश सांबरे,एकनाथ भोईर,कल्याण -मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, मुरबाड तालुका प्रमुख कांतीलाल कंटे,  ठाणे जिल्हा उपप्रमुख संजय भानुशाली,  माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे , उपनगराध्यक्षा दीक्षिता वारघडे ,कल्पेश धुमाळ,  संतोष जाधव, भाऊ यशवंतराव, तानाजी बिराडे,  मिलिंद घरत, साईनाथ भोईर,  नगरसेवक नितीन तेलवणे, नगरसेविका नम्रता तेलवणे, नगरसेवक विनोद नार्वेकर, अक्षय रोठे,  मोहन गडगे, शिवसेना जिल्हा संघटिका उर्मिला लाटे,मुरबाड तालुका महिला आघाडी प्रमुख देवयानी दळवी,,, भरत गायकर,  अलका पारधी,  यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते. वरील सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की कोणत्याही परिस्थितीमध्ये ठाणे जिल्हा परिषद तसेच तसेच मुरबाड पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सर्वांनी आत्ताच कामाला लागा असे आवाहन  केले आहे. 

खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुढे संबोधित करताना म्हणाले की, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना सुमारे अडीच कोटी बहिणींना भाऊबीज म्हणुन दर महा १५०० रुपये दिले. भारत देशात महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य आहे की तेथे महिलांचा सन्मान केला जातो.त्यांनी शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. शिंदे गटाने विधानसभेच्या सुमारे ८० जागा लढविल्या आणि ६० जागांवर आपला विजय मिळवला जर जास्त जागा लढविल्या असत्या तर काय झाले असते.असे विधान करून उपस्थितांचे लक्ष वेधले, मुरबाड रेल्वेचा मी पाठपुरावा करणार आहे असे आश्वासन दिले. 

आगामी निवडणुकीत एकत्र काम करुन विधानसभे प्रमाणे शिंदे गटाला जास्तीत जास्त जागा मिळाल्या पाहिजेत असा आदेश एकनाथ शिंदे यांनी  दिला आहे. आणि त्यांचे स्वप्न आपल्याला पुर्ण करायचे आहे असा ठाम विश्वास श्रीकांत शिंदे यांनी मुरबाड मध्ये  व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...