तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय, फुंडे येथे विद्यार्थी-शिक्षक-पालक मेळावा उत्साहात संपन्न !!
उरण दि ११, (विठ्ठल ममताबादे) : तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय, फुंडे येथे इयत्ता १२ वी कला शाखेचा विद्यार्थी-शिक्षक-पालक मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बाबूराव पाटोळे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थी-शिक्षक-पालक सभेचा उद्देश स्पष्ट केला.
विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन कृष्णाजी कडू यांनी विद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या उज्ज्वल परंपरेचा आढावा घेत विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत यश मिळावे, अशा शुभेच्छा दिल्या.विद्यालयाचे प्राचार्य बबन साळुंखे यांनी वाढत्या शहरीकरण आणि स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे मार्गदर्शन केले. त्यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला तसेच बोर्ड परीक्षेसाठी अभ्यासाचे नियोजन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमास वीर वाजेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोद ठक्कर विशेष उपस्थित होती. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात “स्कूल कनेक्ट” या संकल्पनेच्या माध्यमातून शाळा व महाविद्यालय यांचा सहसंबंध स्पष्ट केला. तसेच महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्याच्या संधी उपलब्ध करून देण्याचे व त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
दि. रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लि. सातारा चे संचालक प्रा. किशोर पाटील व प्रा. हरिश्चंद्र हरड यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.सदर सभेस विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका संगीता थोरात प्रमुख उपस्थित होत्या. प्रा. परशराम कदम, सविता म्हात्रे व प्रा. प्रमोद म्हात्रे यांनी सभेचे यशस्वी नियोजन केले.कार्यक्रमाचे आभार प्रा. कचरू सरोदे यांनी मानले. संपूर्ण मेळावा प्राचार्य बबन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.
No comments:
Post a Comment