Thursday, 16 October 2025

मुरबाड पंचायत समितीच्या १६ जागांचे आरक्षण सोडत जाहीर !!

मुरबाड पंचायत समितीच्या १६ जागांचे आरक्षण सोडत जाहीर !!

मुरबाड { मंगल डोंगरे } -  मुरबाड पंचायत समितीच्या १६ जागांकरिता मुरबाड एम आय डी हाॅल मध्ये  सोमवारी सकाळी अकरा वाजता कल्याण प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांच्या उपस्थितीत मुरबाड तहसीलदार अभिजित देशमुख व नायब तहसीलदार अमोल शिंदे यांनी या लहान मुलांच्या हस्ते चिट्ठी काढून १६ जागेंचे आरक्षण जाहीर केले  ते पुढील प्रमाणे 
१) डोंगरन्हावे- अनु.जाती प्रवर्ग 
२) नारीवली- सर्वसाधारण 

१) धसई,-नामाप्र प्रवर्ग 
२) खोपिवली-सर्वसाधारण महिला राखीव 

१) वैशाखरे- नामाप्र महिला राखीव 
२) फांगुळगव्हाण-अनु.जमाती प्रवर्ग 

१) माळ-अनु.जमाती महिला राखीव 
२) तळेगाव -अनु.जमाती प्रवर्ग 

१) सरळगाव  सर्वसाधारण महिला राखीव 
२) किसळ- नामाप्र प्रवर्ग  

१) कुडवली- नामाप्र महिला राखीव 
२) शिवळे  सर्वसाधारण 

१) शिरवली - सर्वसाधारण महिला राखीव
२) म्हसा- अनु.जाती(st)स महिला राखीव

१) देवगाव - सर्वसाधारण महिला राखीव 
२) आसोळे- सर्वसाधारण .

तसेच  सोमवारी आरक्षण सोडत काढते वेळी  भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीचे, रिपाई सेक्युलर, रिपाई (आठवले गट) यांच्यासह  सर्व पक्षीय पदाधिकारी व पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. मुरबाड पंचायत समितीचा आरक्षण नुकताच जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांनी गेली एक ते दीड वर्षापासून देव पाण्यात बुडून ठेवले होते. परंतु आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांच्या वर पाणीच पाणी फिरल्याने अक्षरक्षा त्यांची हिरमोड झाली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना मोठ्या प्रमाणात वेग आला आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...