Saturday, 11 October 2025

सामाजिक कार्यकर्ते रा.स. पाटील गुरुजी यांचे निधन !

सामाजिक कार्यकर्ते रा.स. पाटील गुरुजी यांचे निधन !

उरण दि ११, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील बोकडवीरा गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि माजी प्राथमिक शिक्षक रामदास सखाराम पाटील गुरुजी (वय ८३) यांचे रविवारी, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने उरण तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रा.स. पाटील गुरुजी हे उरणमधील सर्वपरिचित व्यक्तिमत्व होते. ते उत्कृष्ट निवेदक, कबड्डी समालोचक, बुद्धिबळपटू, नाट्यदिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होते. १९८४ च्या उरण शेतकरी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून लौकिक मिळवला.त्यांनी रायगड जिल्हा पेण प्राथमिक शिक्षक पतपेढीचे सलग दोन कार्यकाळ चेअरमन म्हणून कार्य केले.उरण प्राथमिक शिक्षक पतसंस्था, उरण सेवा निवृत्त ज्येष्ठ नागरिक संस्था, गणेश क्लब बोकडवीरा, गणेश नाट्य मंडळ गणेशपूर, गणेश लेझीम पथक बोकडविरा आणि गणपती देवस्थान ट्रस्ट बोकडवीरा या नामवंत संस्थांमध्ये त्यांनी जबाबदारीने कार्य केले.

गणेश क्लबच्या पटांगणात त्यांनी वर्षानुवर्षे कबड्डीचे उत्कृष्ट समालोचन करून अनेक क्रीडापटूंना प्रेरणा दिली. त्यांच्या प्रभावी आवाजामुळे आणि प्रगल्भनिवेदनशैलीमुळे ते जिल्ह्याबाहेरही प्रसिद्ध निवेदक म्हणून ओळखले जात होते. शिक्षक म्हणून त्यांनी खोपटे, जसखार, मुळेखंड, डोंगरी, पाणजे, मुर्बी, चिखले, न्हावे खाडी आदी ठिकाणी विद्यादानाचे कार्य केले.

No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...