अपघात टाळण्यासाठी अमृत नगर ओएनजीसी कॉलनी ते सुजाता हॉटेल पर्यंतच्या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी !!
घाटकोपर, (केतन भोज) : अमृत नगर ओएनजीसी कॉलनी ते सुजाता हॉटेल पर्यंतच्या रस्त्यावर वाहनांचा वेग हा जास्त होत असल्याकारणाने याठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी केली जात आहे. तसेच येथे बाजूलाच मार्केट, बँक, शाळा विद्यालये आहेत.तसेच हा प्रचंड रहदारीचा मुख्य रस्ता असल्याकारणे मुख्यतः याठिकाणी सकाळच्यावेळी स्कूल बस देखील मोठ्या प्रमाणावर येत- जात असतात. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करता भविष्यात याठिकाणी कोणताही अपघात होऊ नये यासाठी आणि याची गांभीर्यता ओळखून तातडीने मनपा एन विभागाने या रस्त्यावर गतिरोधक बसवावेत. अशी मागणी स्थानिक नागरिक तसेच स्कूल वाहन चालक करत आहेत.
No comments:
Post a Comment